दामू नाईक यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

गोवा फॉरवर्ड व काँग्रेसचा जोरदार पलटवार
गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी)

कारापूर आंदोलक गोव्याची बदनामी करण्यासाठीच दिल्लीत आंदोलन करत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसने दामू नाईक यांच्यावर जोरदार पलटवार करत, सत्तेची धुंदी वेळीच आटोक्यात आणली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला.
१३ जुलै रोजी कारापूरवासीयांनी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करून हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधात आवाज उठवला. स्थानिकांना डावलून बिल्डर लॉबीची पाठराखण करणारे भाजप सरकार कसे काम करत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत असताना, दामू नाईक यांनी आंदोलनकर्त्यांवर टीका करून ते गोव्याची बदनामी करत असल्याचे वक्तव्य केले.
सत्तेचा माज चांगला नव्हे – राजेश कळंगुटकर
गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ते राजेश कळंगुटकर यांनी टीका करताना म्हटले की, भाजपला सत्तेचा माज चढला आहे आणि हा माज चांगला नाही. दामू नाईक किंवा भाजपचा एकही नेता कारापूरवासीयांच्या वेदना जाणून घेण्यासाठी गावात पोहोचला नाही. आमदारही तिथे पाय ठेवत नाही. लोकांची गाऱ्हाणी ऐकण्याऐवजी आंदोलनकर्त्यांची बदनामी करणे ही सत्तेची झिंग आहे. ही नशा जनता लवकरच उतरवेल, असा टोला त्यांनी हाणला.
भाजपच्या अहंकाराचा अतिरेक – अमरनाथ पणजीकर
काँग्रेसचे मीडिया विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दामू नाईक यांच्या वक्तव्याला भाजपच्या अहंकाराचे प्रतीक ठरवले. “दामू नाईक यांना बहुधा भाजप म्हणजेच गोवा असे वाटत असावे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की गोवा हा जनतेचा आहे, भाजपचा नाही. गोव्याची ओळख, संस्कृती आणि भविष्य हे येथील जनतेने घडवले आहे; कोणत्याही राजकीय पक्षाने नाही,” असे ते म्हणाले. आंदोलनकर्त्यांवर दोषारोप करून भाजप सरकारच्या अपयशाकडून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा निष्फळ प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
आंदोलकांच्या बदनामीचा डाव – गौरीश घाडी
कारापूर आंदोलनाचे नेते गौरीश घाडी यांनी आरोप केला की, भाजपच्या आयटी सेलकडून कारापूर आंदोलकांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फेक फेसबुक अकाउंट तयार करून सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांच्यावर अपमानास्पद पोस्ट टाकल्या जात आहेत. तसेच काही गोदी मीडियाला आंदोलनाच्या ठिकाणी पाठवून हे आंदोलन विरोधकांनी पुरस्कृत केल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. शंभर दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता समजून घेण्याऐवजी त्यालाच बदनाम करण्याचा हा डाव भाजपने स्वीकारलेला खालचा स्तर दर्शवतो, असे घाडी यांनी सांगितले.

  • Related Posts

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा…

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    म्हार्दोळ, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याने गुरुवारी माडदोळ येथे आयोजित ‘उटा महामेळाव्या’त पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने एसटी समाजबांधव या महामेळाव्याला उपस्थित राहिले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी चार मतदारसंघ आरक्षित झालेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure