डिचोली पोलिसांकडून कंपनीची तळी

सर्वण कोमुनिदाद घटकांना असहकार्य

गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी)

सर्वण कोमुनिदादच्या जमिनीत अतिक्रमण करून हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनीकडून रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता सर्वण कोमुनिदादच्या गांवकऱ्यांनी अडवला होता. मात्र, कंपनीच्या लोकांनी रातोरात रस्ता अडवणारे खांब काढून तो पुन्हा मोकळा केला. या प्रकरणी कंपनीला जाब विचारण्याऐवजी डिचोली पोलिसांनी सर्वण कोमुनिदादच्या घटकांनाच “जमिनीची कागदपत्रे दाखवा” असे सुनावल्याने गांवकरी संतप्त झाले आहेत.
सर्वण कोमुनिदादच्या मालकीची जमीन असलेल्या सर्वे क्रमांक १९/२ मधील जमिनीवर बेकायदेशीररीत्या डोंगर कापणी करून रस्त्याचे काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सर्वण कोमुनिदादच्या सदस्यांनी डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात औपचारिक तक्रार दाखल केली असून, डिचोली पोलिसांकडेही तक्रार नोंदवली आहे.
तक्रारीसोबत सादर केलेल्या कागदपत्रांनुसार ही जमीन सर्वण कोमुनिदादच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणतीही परवानगी न घेता डोंगर कापणी व इतर कामे करून जमिनीचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गांवकऱ्यांनी नमूद केले आहे की या प्रकारामुळे सामुदायिक मालमत्तेचे नुकसान होत असून गावाच्या हितालाही बाधा पोहोचत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांची चौकशी करावी तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कुंपणाचे खांब रातोरात काढले

डिचोली उपजिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षकांकडे तक्रार करून सर्वण कोमुनिदादच्या गांवकऱ्यांनी त्या ठिकाणी फलक लावून रस्ता अडविण्यासाठी लोखंडी खांबांचे कुंपण टाकले होते. मात्र हे कुंपण कंपनीच्या लोकांनी रातोरात काढून टाकले. याबाबत डिचोली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास गेले असता, पोलिसांनी गांवकऱ्यांनाच “कागदपत्रे आणून दाखवा” असे सांगितले.
मुळात हे कुंपण हटविणाऱ्या कंपनीकडे कागदपत्रे आहेत की नाही, याची पडताळणी न करता गांवकऱ्यांनाच कागदपत्रे दाखवण्याची मागणी करणे म्हणजे पोलिसांकडून कंपनीची उघडपणे बाजू घेण्याचा प्रकार आहे, अशी टीका गांवकऱ्यांनी केली आहे. पोलिस आणि सरकारी यंत्रणा स्थानिकांना वाऱ्यावर सोडून परप्रांतीयांची बाजू घेत असतील तर स्थानिकांना काय किंमत राहिली, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

  • Related Posts

    सुर्लकरांना न्याय, मोपा पीडितांना कधी ?

    सुर्लकरांना न्याय मिळतोय, ही चांगली सुरुवात आहे. पण प्रश्न एवढाच, मोपा पीडितांना न्याय कधी? सुर्ल ग्रामस्थांनी खाण कंपन्यांकडून झालेल्या प्रदूषणामुळे शेती, बागायती आणि जलस्रोतांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उभारलेला लढा…

    सांगेतील वादावर पडदा

    कार्यकर्त्यांचे गैरसमज दूर झाल्याचा दामू नाईक यांचा दावा गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) समाजकल्याणमंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजप मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक…

    You Missed

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    गणेश विसर्जन स्थळाच्या स्वच्छतेसाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’चा पुढाकार

    गणेश विसर्जन स्थळाच्या स्वच्छतेसाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’चा पुढाकार