गाळ उपसा की ‘पैसा’ उपसा ?

पेडणे जलस्त्रोत खात्यात भ्रष्टाचाराचा उच्चांक

गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि पेडणे मतदारसंघात जलस्त्रोत खात्यातर्फे विविध खाजन शेती नाले, ओहळ तसेच नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खंडीत झालेल्या ठिकाणी गाळ उपसाच्या नावाखाली निविदा जारी करून कामे न करता लाखो रुपये हडप केल्याची प्रकरणे उघड झाली आहेत.
तुये नागरिक कृती समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष जुझे लोबो, तुळशीदास राऊत आणि पंचसदस्य निलेश कानोळकर यांनी ही माहिती दिली. तुये येथील तीन खाजन शेतींसाठी गाळ उपसाच्या दोन निविदा जारी करण्यात आल्या. प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या या निविदा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करून १९ नोव्हेंबर २०२५ रोजी गोल्डन ब्रिक्स वर्क स्ट्रक्चर या कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली. कामे पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा अवधी होता.
कामे अपूर्ण, पैसा वसूल
ही कामे सुरूच झाली नाहीत. फक्त एका शेतातील गाळ उपसा करण्यात आल्यानंतर १६ डिसेंबर २०२५ रोजी सहाय्यक अभियंत्याकडून कामे पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. लगेच १६ जानेवारी २०२६ रोजी कंत्राटदाराला पूर्ण रक्कम अदा करण्यात आली, असा गौप्यस्फोट समितीने केला आहे. समितीकडून माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केल्यानंतरच कंत्राटदार तिथे दाखल होऊन कामे सुरू करतो, हे नेमके काय असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.
संयुक्त पाहणीत घोटाळा उघड
तुये पंचायत आणि जलस्त्रोत खात्यातर्फे केलेल्या संयुक्त पाहणीत ही कामे पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही कंत्राटदाराला पूर्ण पैसे अदा करून आता प्रकरण उघडकीस आल्यानंतर कामे सुरू करण्याची घडपड सुरू आहे. या प्रकरणाच्या खोलात गेले असता गाळ उपसाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा पेडणे जलस्त्रोत खात्यात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कामांची चौकशी केल्यास मोठे प्रकरण उघड होईल, असेही समितीने सांगितले.
शिपाईच बनलाय बॉस
पेडणे जलस्त्रोत खात्याचा खरा बॉस हा ह्याच खात्यातील एक शिपाई असल्याची माहिती मिळाली आहे. राजकीय वरदहस्त लाभलेला हा शिपाईच खात्याचा संपूर्ण कारभार हाकतो. आमदारांना त्यांचा हिस्सा पोहोचविण्याचे काम हाच शिपाई करतो. खात्यातील अधिकारी या शिपायाला दचकून असतात, अशीही माहिती समितीने दिली.

  • Related Posts

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Goa University is preparing for a leadership transition, and the selection of its 10th Vice-Chancellor is crucial. After five years marked by academic reforms and controversies, the new appointment will determine the university’s direction for years to come, requiring a leader who can restore trust, transparency, academic freedom, and institutional excellence.

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी अथवा अन्य स्वरूपात १० वर्षापासून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…

    You Missed

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    15/08/2026 e-paper

    15/08/2026 e-paper

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???