‘गोवा’ : ‘केस्तांव दी कॉफूसांव’!

जागा वाटपावरून वाद; स्वतंत्रपणे लढणार

गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी)

राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात एकसंघपणे उभे राहून सत्तेला आव्हान देण्याची गर्जना करणाऱ्या महाविरोधी आघाडीत जागा वाटपावरून केस्तांव दी कॉफूसांव सुरू झाले आहे. काही ठरावीक जागांबाबत तिन्ही पक्षांत एकवाक्यता होत नसल्यामुळे ही आघाडी बिघडण्याच्या मार्गावर आहे. आता प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणुकीत उतरून, मतदानाच्या टक्केवारीवर आधारित फॉर्म्युल्यानुसार विधानसभेच्या आघाडीचा आराखडा तयार करण्याचे ठरवल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसमध्ये धुसफूस
राज्यात सर्वप्रथम आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड हे पक्ष एकत्र आले आणि प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याचा विचार पुढे आणला. यामध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसनेही या आघाडीत सामील व्हावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टोन डिकॉस्ता यांनी आरजीपीच्या नेत्यांशी चर्चा केली.
विधानसभा निवडणुकीतील टक्केवारीच्या आधारे आरजीपीने प्रारंभी २२ जागांची मागणी केली होती. अखेर चर्चेनंतर आणि आघाडीसाठी तडजोडीची तयारी दर्शवून आरजीपीने १३ जागांवर लढण्याचे निश्चित केले. तिकडे गोवा फॉरवर्ड पक्षाने आपल्या दहा जागांची निवड करून सोशल मीडियावर उमेदवार जाहीर करण्याचे तंत्र अवलंबिले.
अखेर काँग्रेस ३०, तर आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड प्रत्येकी १० जागांवर लढण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेतृत्वाकडून पुढे करण्यात आला. मात्र या प्रस्तावातील सांताक्रुझ आणि हणजूणच्या जागांबाबत आरजीपीने तडजोड न करण्याचा निर्णय घेतला. हे निमित्त धरून काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात जाऊन आरजीपीशी युती नको, अशी भूमिका घेतल्याने ही सोयरीक संकटात आली आहे.

आरजीपीशी आघाडी करण्यास हरकत
काँग्रेस पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या समितीतील दोन नेत्यांनी आरजीपीसोबत आघाडी करण्यास तीव्र हरकत घेतली. उर्वरित बहुसंख्य नेत्यांनी आघाडीला पसंती दिली, परंतु काही जागांबाबत तडजोड करण्यास नकार दिला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि एल्टोन डिकॉस्ता यांनी आघाडीसाठी बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांच्या या प्रयत्नांना योग्य साथ न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गोवा फॉरवर्डने काम सुरू केले
एकीकडे आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच गोवा फॉरवर्ड पक्षाने सोशल मीडियावरून उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे काँग्रेसचा एक गट नाराज झाला. गोवा फॉरवर्डला दहा जागांचे आश्वासन दिल्यामुळे या दहा जागांवर उमेदवार जाहीर केले, असा युक्तिवाद पक्षातर्फे केला जात आहे.
यात काणकोणचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांच्या गोवा फॉरवर्ड प्रवेशामुळे आरजीपी आणि काँग्रेसमध्येही नाराजी पसरली असून, त्यामुळे संबंध ताणले गेल्याची माहिती आहे.

स्वबळावर किंवा मित्रत्वाच्या आधारे
आता अखेर तिन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुकीत उतरावे किंवा आघाडीच्या जागा वाटपाचे पालन करून, ज्या काही ठिकाणी वाद आहे तिथे प्रत्येकाने आपला उमेदवार उतरवून आपली ताकद आजमवावी, असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. या फॉर्म्युल्याबाबत अजूनही एकमत न झाल्यामुळे मंगळवारपर्यंत आघाडी की बिघाडी हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    जीसीझेडएमएच्या निरीक्षणांकडे सरकारचे दुर्लक्ष गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) मांडवी नदीत डेल्टा प्लेझर क्रूझ कंपनी प्रा. लि. यांच्या एम.व्ही. डेल्टीन रॉयल या नव्या भव्य जहाजास परवानगी देण्यासंदर्भात गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन…

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    मडगाव – “श्री गणेश पॅंडल स्कॅंडल प्रकरणापासून ते आकें रिंग रोडवरील श्री गणेश मंदिराबाहेर समाजकंटकांचा अड्डा तयार करण्यापर्यंत, पक्षबदलू आमदार व सार्वजनीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी आता सर्व मर्यादा…

    You Missed

    26/03/2026 e-paper

    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns