गोमंतकीय कलावंतांचा महाराष्ट्रात झंकार; “तो मी नव्हेच!” नाटकाच्या दौऱ्याचे कौतुक



मांद्रे, दि. १४ : गोव्याच्या रंगभूमीची परंपरा आणि गोमंतकीय कलावंतांची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रात झळकणार असून, गंगाळदेव नाट्य मंडळ मांद्रे सादर करीत असलेले “तो मी नव्हेच!” हे अजरामर नाटक आता महाराष्ट्र दौऱ्यावर रंगणार आहे. या निमित्ताने नाट्यसंपदा गोवा आणि गंगाळदेव नाट्य मंडळ या दोन्ही संस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

गोमंतकीय कलावंतांनी राज्याबाहेर जाऊन आपल्या अभिनयाची आणि सादरीकरणाची ठळक छाप निर्माण करणे ही अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही नाट्यसंपदा गोवा यांच्या कलाकारांनी महाराष्ट्रासह विविध ठिकाणी आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.

हौशी कलाकार ते व्यावसायिक रंगभूमी हा प्रवास अत्यंत संघर्षमय असतो. सातत्य, मेहनत, निष्ठा आणि कलेवरील नितांत प्रेम यांच्या बळावर अनेक कलाकारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे अनेक कलाकारांनी कोणतेही शास्त्रशुद्ध नाट्यप्रशिक्षण न घेता केवळ अनुभव आणि जिद्दीच्या जोरावर ही उंची गाठली आहे.

पेडणे तालुक्याची नाट्यपरंपरा ही राज्यभर प्रसिद्ध असून, येथे कला केवळ छंद म्हणून नव्हे तर पूर्ण समर्पणाने जोपासली जाते. त्यामुळे राज्याबाहेर जाऊन आपल्या कलेची दाद मिळवणे हे निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मानले जात आहे.

प्रभाकर पणशीकर यांच्या अजरामर भूमिकेमुळे विशेष गाजलेले “तो मी नव्हेच!” हे फिरत्या रंगमंचावरील नाटक गंगाळदेव नाट्य मंडळ मांद्रे गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने सादर करत आहे. अनिल आसोलकर यांनी अत्यंत मेहनत आणि  कष्ट घेऊन आपली भूमिका वठवली आहे. आता महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून गोमंतकीय कलेचा ठसा उमटवण्यासाठी संपूर्ण चमू सज्ज झाला आहे.

या नाटकातील सर्व कलाकार, पडद्यामागील तंत्रज्ञ तसेच निर्मिती प्रक्रियेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कौतुक होत असून, महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांवरही हे नाटक आपली अमिट छाप उमटवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

“पेडणे आणि गोमंतक ही नाट्यकलेचा समृद्ध वारसा जपणारी भूमी आहे, हे पुन्हा एकदा या दौऱ्यातून सिद्ध होईल,” अशा भावना व्यक्त करत रंगदेवतेकडे संपूर्ण चमूसाठी यशस्वी दौऱ्याची प्रार्थना करण्यात आली आहे.

  • Related Posts

    ‘विकसित गोवा – २०३७’ ची रूपरेषा
    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नीती आयोगासमोर सादरीकरण

    नवी दिल्ली, दि. ११ : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी नीती आयोगाच्या ११ व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीत गोव्याच्या मानव संसाधन विकास, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), महिला…

    फातोर्ड्यातील भातशेती जमीन परत द्या

    विजय सरदेसाई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीगांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून फातोर्डा येथील घाऊक मासळी बाजारालगतची संपादीत भातशेती जमीन शेतकरी…

    You Missed

    ‘विकसित गोवा – २०३७’ ची रूपरेषा
    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नीती आयोगासमोर सादरीकरण

    ‘विकसित गोवा – २०३७’ ची रूपरेषा<br>मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नीती आयोगासमोर सादरीकरण

    11/06/2026 e-paper

    11/06/2026 e-paper

    फातोर्ड्यातील भातशेती जमीन परत द्या

    फातोर्ड्यातील भातशेती जमीन परत द्या

    विकासाचा लेखाजोखा कधी?

    Prabhav Naik Seeks Transparency on Proposed Hydraulic Parking Project in Margao

    Prabhav Naik Seeks Transparency on Proposed Hydraulic Parking Project in Margao

    Konkan Railway Detects Over 61,000 Ticketless and Irregular Travellers in May; Collects ₹3.70 Crore in Penalties

    Konkan Railway Detects Over 61,000 Ticketless and Irregular Travellers in May; Collects ₹3.70 Crore in Penalties