`गोंय राखण यात्रा’ उद्यापासून

राहूल गांधी, के. सी. वेणुगोपाल यांची उपस्थिती

गांवकारी,दि.२१ (प्रतिनिधी)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बहुचर्चित ‘गोंय राखण यात्रा’ २२ सप्टेंबरपासून सुरू होत असून १८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. २७ दिवसांच्या या यात्रेत राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. यात्रेच्या अधिकृत कार्यक्रमानुसार २२ सप्टेंबर रोजी पणजी-ताळगांवपासून या मोहिमेला सुरुवात होईल.
आज आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ही माहिती दिली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल २३ सप्टेंबर रोजी यात्रेत सहभागी होणार आहेत. त्या दिवशी यात्रा प्रियोळ आणि कुंभारजुवे मतदारसंघांतून जाणार आहे. काँग्रेसने या यात्रेला केवळ पक्षीय कार्यक्रम न ठेवता विविध सामाजिक संघटना आणि समविचारी घटकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, यात्रेच्या १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या समारोपासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसकडून पक्षाच्या इतर राष्ट्रीय नेत्यांनाही यात्रेच्या विविध टप्प्यांत सहभागी होण्यासाठी निमंत्रणे देण्यात आली आहेत.

जमीन रूपांतरण, बेरोजगारी, सामाजिक सलोखा, कायदा-सुव्यवस्था तसेच गोव्याची जमीन आणि अस्मिता हे या मोहिमेतील प्रमुख मुद्दे आहेत. काँग्रेसने विशेषतः नगर नियोजन कायद्यातील कलम ३९(ए) अंतर्गत होणाऱ्या जमीन रूपांतरणाचा मुद्दा यात्रेच्या अजेंड्यावर घेतला आहे.

  • Related Posts

    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    मडगांवात २२ तर म्हापशात २३ रोजी संवाद गांवकारी,दि.२१ (प्रतिनिधी) गोव्याची जमीन, पर्यावरण, शेती आणि नियोजनाशी संबंधित विविध प्रश्नांवर जनसहभाग अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘इनफ इज इनफ’ गोवा चळवळीचे निमंत्रक तथा…

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Indian squash player Yash Fadte reached the quarterfinals of the PSA Aramis Club Open in Belgium, demonstrating resilience in a grueling five-game battle against Scottish No. 1 John Meehan, following a remarkable comeback victory in the pre-quarterfinals.

    You Missed

    21/09/2026 e-paper

    21/09/2026 e-paper

    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?

    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?

    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    `गोंय राखण यात्रा’ उद्यापासून

    `गोंय राखण यात्रा’ उद्यापासून

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला