ग्रामस्थांच्या समस्या सुटेपर्यंत सुर्लातील खाण सुरू होणार नाही!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही; खनिज डंप हाताळणीबाबत अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित

गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) : सुर्ला गावातील साळगावकर खाण कंपनीच्या जुन्या खनिज डंपच्या हाताळणीला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत असतानाच, गावकऱ्यांच्या समस्या सोडविल्याशिवाय खाण सुरू होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. खाण कंपनीला काही आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्या, तरी खाण सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुर्ला गावात सुमारे ३५ वर्षांपूर्वी साठविण्यात आलेल्या खनिज डंपच्या हाताळणीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या डंपवर गेल्या अनेक वर्षांत नैसर्गिक वनसंपदा विकसित झाली असून, डंपच्या हाताळणीमुळे गावातील पर्यावरण, शेती, जलस्रोत आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर रविवारी सुर्ला येथील साळगावकर गेस्ट हाऊसजवळ ग्रामस्थांनी शांततापूर्ण आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ग्रामस्थांना आवाहन करत खाण सुरू करण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

साळगावकर खाण कंपनीला काही कागदपत्रे आणि परवानग्या प्राप्त झाल्या असल्या, तरी खनिज वाहतूक, डंप हाताळणीमुळे होणारे धुळीचे प्रदूषण आणि ग्रामस्थांच्या अन्य समस्यांवर समाधानकारक तोडगा काढणे आवश्यक आहे. या समस्या सुटेपर्यंत खाण सुरू होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर ग्रामस्थ नियोजित आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. खनिज डंपच्या हाताळणीमुळे गावाच्या पर्यावरणाला आणि स्थानिकांच्या जीवनमानाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर प्रत्यक्षात प्रशासन कोणती पावले उचलते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Related Posts

    Panjim Gymkhana Land Misuse Row: Collector Seeks Urgent Inquiry Report After Repeated Delays

    RTI activist Devidas Panjikar alleges unauthorised commercial use of government-leased land at Campal; Additional Collector directs submission of inquiry report within one week

    मराठीचा अभिमान भाषणापुरता नको, व्यवहारातही दिसावा : डॉ. घनश्याम बोरकर

    ज्येष्ठ कवी डॉ. घनश्याम बोरकर यांनी प्रतिपादन केले की, मराठी भाषेचा अभिमान केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता व्यवहारातही दिसला पाहिजे. तसेच गोव्यातील मराठी आणि कोंकणी भाषिकांनी संघर्षाऐवजी परस्पर सन्मानाची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात केले.

    You Missed

    Panjim Gymkhana Land Misuse Row: Collector Seeks Urgent Inquiry Report After Repeated Delays

    Panjim Gymkhana Land Misuse Row: Collector Seeks Urgent Inquiry Report After Repeated Delays

    मराठीचा अभिमान भाषणापुरता नको, व्यवहारातही दिसावा : डॉ. घनश्याम बोरकर

    मराठीचा अभिमान भाषणापुरता नको, व्यवहारातही दिसावा : डॉ. घनश्याम बोरकर

    नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन

    नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन

    14/11/2026 e-paper

    14/11/2026 e-paper

    एसटी राजकीय आरक्षणासंबंधी उद्या सांगेत महत्त्वपूर्ण बैठक

    एसटी राजकीय आरक्षणासंबंधी उद्या सांगेत महत्त्वपूर्ण बैठक

    केळशीमधील वाळूच्या टेकड्यांच्या नाशप्रकरणी फौजदारी कारवाई करा : खासदार विरियातो फर्नांडिस

    केळशीमधील वाळूच्या टेकड्यांच्या नाशप्रकरणी फौजदारी कारवाई करा : खासदार विरियातो फर्नांडिस