हाजीर हो! आंदोलकांना नोटिसा…

पोलिसांमार्फत छळवणुकीच्या तक्रारी

गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)

शिरदोन-पाळे गावचे आंदोलक तसेच आमदार विरेश बोरकर आणि त्यांचे साथीदार तुषार गावस यांनी उपोषण मागे घेतले असले तरी नगर नियोजन कार्यालयावरील मोर्चा आणि दोनापावला येथील मंत्री विश्वजीत राणे यांच्या बंगल्याबाहेरील मोर्चा प्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत.
नगर नियोजन कार्यालय प्रकरणी आमदार विरेश बोरकर, तुषार गावस यांच्यासह ३९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोनापावला मोर्चा प्रकरणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह विरोधी आमदार, सामाजिक कार्यकर्ते तसेच सरकारविरोधी समाजमाध्यमांवर नेहमीच टीका करणाऱ्यांसह दीड हजार लोकांचा समावेश आहे. या सर्वांना नोटिसा पाठविण्यात आल्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार विरेश बोरकर यांना दिले असले तरी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. आज ताळगाव आऊटपोस्ट येथे अनेकांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. टॅक्सी संघटनेचे नेते योगेश गोवेकर, गजानन तिळवे, फ्रान्सिस कुएलो यांनी आज ताळगाव आऊटपोस्टमध्ये हजेरी लावली. हजारो नोटिसा पाठविल्याने सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारला खरोखरच हा विषय संपवायचा आहे की जाणीवपूर्वक ताजा ठेवायचा आहे, असा सवाल पीडितांनी केला आहे.
खोटी तक्रार आणि…
नगर नियोजन कार्यालयातील दहा फाईल्स गायब झाल्याची तक्रार मुख्य नियोजक विनोद कुमार चंद्रा यांनी पणजी पोलिस स्थानकात केली आहे. या तक्रारीत अनेकांची नावे घालण्यात आली आहेत. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब हे २० रोजीच्या आंदोलनात रात्री सहभागी झाले, असेही त्यांनी नमूद केले आहे.
ही तक्रार पाहता विनोद कुमार चंद्रा यांच्यावर दबाव टाकून ही तक्रार देण्यास भाग पाडले असावे, अशी शक्यता अनेकांनी वर्तविली आहे. विनोद कुमार चंद्रा यांच्याविरोधातच अनेक तक्रारी दाखल झाल्या असून त्यांची चौकशी दक्षता खात्यामार्फत सुरू आहे. बेहिशेबी मालमत्ता, बनावट प्रमाणपत्रांच्या तक्रारीही त्यांच्या विरोधात दाखल झाल्याची माहिती एका आरटीआय कार्यकर्त्याने दिली. आमदार विरेश बोरकर, तुषार गावस, स्वप्नेश शेर्लेकर, मनोज परब, अजय खोलकर तसेच शिरदोन-पाळेवासियांची नावे या एफआयआरमध्ये नोंद करण्यात आली आहेत.
दोनापावला मोर्चात अनेकांना अडकवले
दोनापावला येथील विश्वजीत राणे यांच्या बंगल्याबाहेरील मोर्चा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, मनोज परब, वाल्मिकी नायक, ॲड. कार्लूस फेरेरा यांच्यासह सुमारे दीड ते दोन हजार लोकांचा सहभाग आहे. या प्रकरणी नोटिसा जारी करण्याचे काम सुरू आहे.
या नोटिसा मिळाल्यानंतर संबंधितांना पोलिस स्थानकात किंवा चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागणार आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना हेलपाटे मारायला भाग पाडून त्याचा बदला घेण्याची सरकारची मानसिकता लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

  • Related Posts

    सरकारची शरणागती, उपोषण मागे

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची यशस्वी शिष्टाई गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) भाजप विधीमंडळ गट आणि कोअर समितीच्या आक्रमक भूमिकेनंतर आझाद मैदानावरील आंदोलन मोडून काढणार अशी चर्चा सुरू होती. मात्र मुख्यमंत्री…

    बचाव सोडून सरकार आक्रमक

    आमदार विरेश बोरकर, स्वप्नेश शेर्लेकर, राजदीप नाईक यांच्याविरोधात एफआयआर गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) राज्यातील विविध आंदोलने आणि सरकारवर होणाऱ्या टीकेला बचावात्मक पवित्र्याने सामोरे जाण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भूमिकेवर…

    You Missed

    Opposition in a Political Labyrinth, BJP at Advantage

    Opposition in a Political Labyrinth, BJP at Advantage

    विरोधकांचा चक्रव्यूह आणि भाजपची रणनिती

    विरोधकांचा चक्रव्यूह आणि भाजपची रणनिती

    हाजीर हो! आंदोलकांना नोटिसा…

    हाजीर हो! आंदोलकांना नोटिसा…

    28/02/2026 e-paper

    28/02/2026 e-paper

    27/02/2026 e-paper

    27/02/2026 e-paper

    सरकारची शरणागती, उपोषण मागे

    सरकारची शरणागती, उपोषण मागे