सरकारची शरणागती, उपोषण मागे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची यशस्वी शिष्टाई

गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी)

भाजप विधीमंडळ गट आणि कोअर समितीच्या आक्रमक भूमिकेनंतर आझाद मैदानावरील आंदोलन मोडून काढणार अशी चर्चा सुरू होती. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संयम दाखवत यशस्वी शिष्टाई केली. गुरुवारी रात्री आमदार विरेश बोरकर यांनी सरकारी प्रस्तावाला सहमती दर्शवून आमरण उपोषण मागे घेतले. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या धुर्तपणाचे कौतुक होत असतानाच भाजपात आणि सरकारात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरूदास देसाई यांनी चर्चा करून नगर नियोजन खात्यामार्फत सांतआंद्रे मतदारसंघातील ३९ (ए) अंतर्गत मंजूर झालेले प्रस्ताव निलंबित करण्याचा आदेश आमदार बोरकर यांना सुपूर्द केला. नगर नियोजन कार्यालयातील चोरी आणि दोनापावला येथील मंत्री विश्वजीत राणे यांच्या बंगल्यावरील मोर्चाबाबत पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार विरेश बोरकर यांनी दिली.
सरकारच्या प्रस्तावाबाबत क्लॉड आल्वारीस आणि एड. नॉर्मा आल्वारीस यांचा कायदेशीर सल्ला घेऊन इतर विरोधी आमदार आणि शिरदोन-पाळेवासियांशी चर्चा करून हा प्रस्ताव मान्य करण्याचा निर्णय आमदार बोरकर यांनी जाहीर केला. आगामी विधानसभा अधिवेशनात कलम ३९(ए) रद्द करण्यासाठी आपण आवाज उठवणार असल्याचेही ते म्हणाले. हे वादग्रस्त कलम रद्द झाले नाही तर नव्याने राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
ही घोषणा झाल्यानंतर एड. नॉर्मा आल्वारीस यांनी आमदार विरेश बोरकर आणि शिरदोन-पाळेचे युवा कार्यकर्ते तूषार गंवस यांना पेयजल आणि श्री सातेरी देवीचा प्रसाद भरवला व उपोषण संपल्याचे जाहीर केले. उपस्थित सर्वांनी जल्लोष करून आंदोलनाच्या यशाचे कौतुक केले. यानंतर आमदार विरेश बोरकर आणि तूषार गंवस यांना खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले.

भाजपात चिंता, सरकारात अस्वस्थता
राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरून आंदोलने सुरू आहेत. अलिकडच्या काळात आंदोलकांच्या मागण्यांची पूर्तता केली जात असल्याने सरकारकडून चुकीचे निर्णय घेतले जात आहेत, असा संदेश लोकांत जात आहे. त्यामुळे त्याचा फटका पक्षाला बसणार असल्याची भीती भाजपातील अनेकांना सतावत आहे.
पक्षातील एक गट सरकारच्या या भूमिकेबाबत नाराज आहे, तर दुसरा गट सरकार योग्य निर्णय घेऊन लोकांना न्याय देत असल्याने त्याचा चांगला संदेश लोकांपर्यंत जात असल्याचा दावा करतो. सरकारातही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत छुपी चर्चा सुरू आहे. काही नेते सरकारच्या कचखाऊ भूमिकेमुळे नाराज आहेत, तर सरकारातील मंत्र्यांचा एक गट भक्कमपणे मुख्यमंत्र्यांसोबत आहे.
काँग्रेस पक्षातून भाजपात दाखल झालेल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता असून, पक्षात राहूनच भाजपाकडून आपला ‘गेम’ केला जात तर नाही, असा विचार काही नेते करू लागले आहेत. तूर्त पक्षासोबत राहणेच योग्य ठरेल या विचाराने हे मंत्री गुपचुपपणे हे सगळे सहन करत असल्याचे जाणवते.

विरोधकांत संशयकल्लोळ
आझाद मैदानावरील आंदोलन आणि एकूणच घडामोडींवर विरोधकांमध्ये एकमेकांप्रती संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांना लक्ष्य बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडूनच काही विरोधकांना फुस लावली जात असल्याची चर्चा सुरू आहे.
आरजीपी पक्षाचा उपयोग सरकारातील काही घटक आपल्या अंतर्गत राजकारणासाठी करत असल्याची भावना एका गटात निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा आंदोलनाला पाठींबा काँग्रेस पक्षातील काही लोकांना पसंत पडलेला नाही.
आपचे आमदार वेन्झी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने आरजीपी आणि काँग्रेस आमदारांशी चांगले संबंध प्रस्थापित करून युतीच्या चर्चेची वाट मोकळी केली. त्यामुळे या आंदोलनामुळे विरोधी आमदार एकत्र येण्यात मदत झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

  • Related Posts

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    डिचोली,दि.१८: गोव्याच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय ठरणाऱ्या एका सोहळ्यात लेखक आत्माराम गांवकर यांनी एका वर्षात लिहिलेल्या तब्बल १०३ शैक्षणिक पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन करण्यात आले. डिचोली येथील हिराबाई झांट्ये…

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    GPCC President Girish Chodankar expressed serious concern over a religious leader’s threat of self-immolation if justice is denied to Karapur-Sarvan villagers, urging CM Pramod Sawant to intervene and resolve the issue through dialogue.

    You Missed

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला

    भविष्यातील संकटाचे सुतोवाच

    भविष्यातील संकटाचे सुतोवाच

    18/07/2026 e-paper

    18/07/2026 e-paper