
संपूर्ण निर्मिती हा ऊर्जेचा साक्षात्कार आहे. सृजनातील प्रत्येक वस्तू, सर्व लोक (अस्तित्वाची परिमाणे) आणि युगे (काळाची परिमाणे) ऊर्जा रूपात अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे जीवसृष्टी केवळ पृथ्वीवरच अस्तित्वात आहे आणि स्वर्गीय जगाचा एक भाग म्हणून अस्तित्वात असलेली विविध परिमाणे येथूनच अनुभवता येतात आणि तिथे पोचता येते.
आपली संस्कृती हजारो देवी-देवतांच्या अस्तित्वाबद्दल सांगते, त्यामुळे जर परमात्मा एक आणि निराकार असेल, तर ज्याला आपण देव म्हणतो त्याची ही रूपे खरोखर काय आहेत, असा प्रश्न पडतो. विश्वातील सूर्य, चंद्र, ग्रह, तारे या सर्व वस्तू परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात असलेल्या दैवी शक्ती आहेत. हे सर्व आपल्याला वस्तूसारखे वाटत असले तरी ते आपली कर्मे करीत असतात. परमब्रह्म हा ऊर्जेचा खरा स्त्रोत असला तरी ती नियंत्रित करण्यासाठी खास तयार केलेल्या ऊर्जेद्वारे भौतिक निर्मितीच्या प्रत्येक पैलूची काळजी घेतली जाते. यावरून देवतांचे किंवा ईश्वराच्या विविध रूपांचे अस्तित्व स्पष्ट होते. पृथ्वीच्या हालचालींमुळे काळाचे परिमाण बदलते. पृथ्वी आपल्या अक्षावर झुकलेली आहे. जेव्हा अक्ष झुकतो तेव्हा युगे बदलतात आणि जेव्हा ती अक्षावर फिरते तेव्हा ऋतू बदलतात. एका आयामातून दुसऱ्या परिमाणाकडे होणारी प्रत्येक हालचाल बदल घडवून आणते कारण प्रत्येक दिवस त्याच्या अनोख्या ऊर्जेच्या नमुन्यांसह येतो.
आध्यात्मिक साधकाच्या जीवनात महाशिवरात्री, होळी, गुरुपौर्णिमा आणि दिवाळी या चार रात्रींना खूप महत्त्व आहे. जीवन ज्याला आपण आत्म्याचा प्रवास म्हणतो, त्यामध्ये एखाद्या योग्याने स्वतःला सतत शुद्ध करणे आणि स्वतःमध्ये उच्च शक्तींची जागृती करणे आवश्यक आहे. काही दिवस असे निवडले जातात कि त्या दिवशी सामान्य दिवसाच्या तुलनेत सनातन क्रिया आणि तंत्र साधना यांसारख्या साधनांचा प्रभाव अनेक पटींनी वाढू शकतो. हे दिवस निवडून त्यांचे महत्व अधोरेखीत केले गेले. सर्वसामान्यांच्या आकलनासाठी ते दिवस कथांशी निगडित होते. होलिकेच्या कथेत जेव्हा हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला, प्रल्हादला मारण्याच्या सर्व प्रयत्नात अपयशी ठरतो, तेव्हा तो त्याला होलिकेच्या मांडीवर ठेवून पेटवून देण्याचा निर्णय घेतो.
होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही असे वरदान देण्यात आले होते. परंतु, प्रल्हादाची भगवान विष्णूवर पूर्ण श्रद्धा असल्याने तो अग्नीतून निर्भयपणे बाहेर आला, तर होलिका भस्मसात झाली. नकारात्मकतेवर सकारात्मक शक्तींचा विजय या कथेत दाखवण्यात आला आहे. या कथा भूतकाळातील अतिमानवी क्षमता असलेल्यांनी आपल्याकडे सुपूर्द केल्या आहेत आणि प्रत्येकाचा अर्थ सृष्टीच्या रहस्यांइतकाच खोल आहे. हा अर्थ योग्य टप्प्यावर अभ्यासकासमोर उघड होतो.
आध्यात्मिक साधकासाठी हा टप्पा म्हणजे सनातन क्रिया आणि तंत्र साधनेची रात्र असते. प्रत्येक पावलावर आपल्या शिष्याचे निरीक्षण करणारे, त्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करणारे गुरु त्याला विशिष्ट मंत्र देतात आणि या रात्री योग्य मुहूर्तावर क्रिया सुचवतात. ज्यासाठी आयुष्यभर परिश्रम करावे लागतील असे आश्चर्यकारक मानसिक अनुभव, सरावाने एका रात्रीत प्राप्त होतात.
होळीच्या मुहूर्तावर अश्विनी गुरुजी १३ मार्च, दुपारी १२.३० वाजता होळी आणि मंत्रांवर प्रबोधन करणार आहेत. अश्विनी गुरुजी ध्यान आश्रमाचे मार्गदर्शक आहेत. अधिक माहितीसाठी
Www.dhyanfoundation.com
– – अश्विनी गुरुजी, ध्यान आश्रम