जेनिफर मोन्सेरात : सरपंच ते मंत्री, एक वेगळा राजकीय ठसा


गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी) – ताळगांवच्या आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवारी (दि. १९) दीर्घ आजाराशी झुंज देत अखेर निधन झाले. त्या ५६ वर्षांच्या होत्या. गेली दोन वर्षे त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. एका खाजगी इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवार (दि. २०) रोजी सांतइनेज येथील हिंदू स्मशानभूमीत हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार होणार आहेत.


राज्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या त्या पत्नी तर पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात यांच्या त्या मातोश्री होत. गोवा विधानसभेत निवडून आलेले पहिले दांपत्य म्हणून बाबुश आणि जेनिफर मोन्सेरात यांची ओळख कायम स्मरणात राहील.
राजकीय प्रवास
जेनिफर मोन्सेरात यांनी आपल्या पतीसोबत राजकारणात प्रवेश केला असला तरी त्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि लोकाभिमुख कार्यशैलीने वेगळा ठसा उमटवला.
• २००४ मध्ये ताळगांव पंचायतीवर पंचसदस्य म्हणून निवडून आल्या.
• जिल्हा पंचायत निवडणुकीत विजय मिळवून उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपद भूषविले (२००५–२००७).
• २००७ मध्ये सांताक्रुझ मतदारसंघातून युगोडेपातर्फे विधानसभा निवडणूकीत पराभव
• २००९ ते २०१२ या काळात ताळगांवच्या सरपंचपदी कार्यरत राहिल्या.
• २०१२ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार म्हणून विधानसभेत प्रवेश केला.
• २०१७ मध्ये पुन्हा काँग्रेसच्या आमदार बनल्या.
• २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून प्रमोद सावंत सरकारमध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून कार्यरत राहिल्या (२०१९–२०२२).
• २०२२ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर विजय मिळवून पुन्हा आमदार बनल्या.
पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार आणि मंत्री अशी सर्व पदे भूषवून त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधित्व केले.
सुस्वभावाची देणगी
जेनिफर मोन्सेरात यांची ओळख एक सुस्वभावी, नम्र आणि आदराने वागणारी नेत्या म्हणून होती. बाबुश मोन्सेरात यांच्या पत्नी म्हणून त्यांची ओळख मर्यादित राहिली असली तरी त्यांच्यात गर्विष्टपणा नव्हता. सर्वांशी आदराने बोलण्याची त्यांची सवय लोकांच्या मनात घर करून गेली होती.
गेल्या दोन वर्षांत आजारामुळे त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिल्या होत्या. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकारणात एक सुस्वभावी आणि लोकाभिमुख नेत्या गमावली गेली आहे.

  • Related Posts

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा…

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    म्हार्दोळ, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याने गुरुवारी माडदोळ येथे आयोजित ‘उटा महामेळाव्या’त पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने एसटी समाजबांधव या महामेळाव्याला उपस्थित राहिले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी चार मतदारसंघ आरक्षित झालेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure