कारापूर आंदोलनाला हत्तीचे बळ

‘इनफ इज इनफ’ चळवळीचा पाठींबा

गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी)
कारापूर येथील नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी विक्री केलेल्या जमिनीत ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ प्रकल्पाच्या विरोधात सुरू असलेल्या कारापूर–सर्वण गावच्या स्थानिक लोकांना आता हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. ‘इनफ इज इनफ’ चळवळीचे नेते निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. या प्रकल्पासाठी नगर नियोजन खात्याने गैरमार्गाने परवाने दिल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.
निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी यासंबंधी पत्रक जारी केले आहे. कारापूर येथील प्रकल्पाला नगर नियोजन मंडळाने दिलेल्या परवान्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारापूरच्या या प्रकल्पामुळे येथील गावकऱ्यांनी उभारलेले आंदोलन हे त्यांच्या भवितव्याच्या चिंतेचे प्रतीक आहे. या प्रकल्पामुळे येथील शेती, बागायती, जलस्त्रोत, पारंपरिक वाटा आणि पर्यावरणीय स्रोत नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मूळात कारापूरच्या या प्रकल्पाला वादग्रस्त कलम १७(२) आणि ३९(ए) अंतर्गत परवाने देण्यात आले आहेत. १७(२) मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केले आहे, तर ३९(ए) न्यायप्रविष्ट आहे. मग या प्रकल्पाचे काम सुरू कसे आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. या सर्व परवान्यांचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यातील पंचायत व नगरपालिका संस्थांनी सावधगिरी बाळगून कलम १७(२) आणि ३९(ए) अंतर्गत परवाने देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
सर्वण कोमुनिदादची बैठक
कारापूर येथील लोढा प्रकल्पाच्या रस्त्यासाठी सर्वण कोमुनिदादची जमीन देण्यात आली आहे. मात्र या जमिनीबाबत काहीच माहिती सर्वण कोमुनिदादला नसल्याचे समजते. ही जमीन रस्त्यासाठी नेमकी कुणी दिली आणि त्यासाठी नेमका काय व्यवहार झाला, हे कोमुनिदादच्या अनेक घटकांना माहित नसल्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वण कोमुनिदादची महत्त्वाची बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Related Posts

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    काँग्रेस नेत्यांनी आरोप केला आहे की, गेल्या पंधरा वर्षांत उत्तर गोव्यात सत्ताधारी नेत्यांचाच विकास झाला असून, गोव्याच्या जमिनी बिल्डर लॉबी आणि खासगी विद्यापीठांच्या घशात घालण्याचे काम केले जात आहे.

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    रमेश तवडकर यांना पूर्ण विश्वास गांवकारी,दि.३०(प्रतिनिधी) राज्यातील अनुसुचित जमातीला राजकीय आरक्षणाच्या विषयावर आपण केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी उपेंद्र जोशी यांच्यामार्फत या गोष्टीकडे आपण जातीने लक्ष ठेवून…

    You Missed

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    30/09/2026 e-paper

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain