कोंकणीमुळे केंद्राच्या ८ हजार नोकऱ्या उपलब्ध

पत्रकार संदेश प्रभूदेसाई यांची माहिती

गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी)
गोव्याची राज्यभाषा कोंकणी भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसुचीत समाविष्ट केल्यापासून गोव्यात केंद्र सरकाराच्या आस्थापनांमध्ये वा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आजच्या घडीस ८ हजार नोकऱ्या व व्यवसाय निर्माण झालेले आहेत, परंतु त्या गोव्यातील बेरोजगार युवकांना देण्यासाठी गोवा सरकारने काहीही पावले उचललेली नाहीत असे प्रतिपादन पत्रकार व संशोधक संदेश प्रभुदेसाई यांनी केले आाहे.
कोंकणी राष्ट्रमान्यता दिनाच्या निमित्याने माशे, काणकोण येथील सत्यवती सोयरू आंगले उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात या विषयावर त्यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.
एकदा राज्यातील स्थानिक भाषा संविधानाच्या आठव्या अनुसुचीत समाविष्ट केली गेली की हिंदी, इंग्रजी व स्थानिक राज्यभाषा हे त्रिसुत्री भाषेचे धोरण राज्यात लागू करणे बंधनकारक आहे. “या धोरणानुसार लोकांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व नोकऱ्या या स्थानिक भाषा अवगत असलेल्यानांच द्याव्या लागतात व त्यांची राज्याबाहेर बदलीही करता येत नाही”, असे प्रभुदेसाई यांनी बोलताना सांगितले.
राष्ट्रपतींचा आदेश १९६० यानुसार गोव्यातील केंद्र सरकारची खाती व निम्नसरकारी आस्थापनांच्या कार्यालयांमध्ये तसेच बँकांच्या सर्व शाखांमध्ये त्यांचे फलक, तकटे, प्रकाशने व लोकोपयोगी कागदपत्रे ही हिंदी, इंग्रजी व कोंकणी भाषेत असणे बंधनकार आहे. “हे धोरण भारतभरातील सर्व राज्यांमध्ये लागू करण्यात आलेले आहे. परंतु आठव्या अनुसुचीत कोंकणी समाविष्ट करून सुद्धा गेली ३३ वर्षॆ गोवा सरकार याबाबत उदासीन राहिल्याने गोव्याचे युवक या सुवर्णसंधीपासून वंचित राहिलेले आहेत”, असे ठोस प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
संसदेने १९६८ साली संमत केलेल्या ठरावानुसार व त्यानंतर केंद्र सरकाराच्या राजभाषा मंत्रालयनाने आजपर्यंत जारी केलेल्या सुमारे २५० परिपत्रकांनुसार केंद्र सरकाराचे सर्व कायदे, आदेश, परिपत्रके व इतर सरकारी कागदपत्रे कोंकणीतून भाषांतरित करणे सक्तीचे आहे. त्याशिवाय नॅशनल बूक ट्रस्ट सारख्या संस्थांनी प्रकाशित केलेले साहित्यही कोंकणीत आणणे बंधनकारक आहे. “केवळ या एकाच गोष्टीची अंमलबजावणी केल्यास गोव्यातील शेकडो बेरोजगार युवकांंना भाषांतरकाराच्या नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील” ही बाबही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली.
गोव्यात केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली येणारी सुमारे १ हजार कार्यालये असून त्यात ४२ सरकारी व निम्न-सरकारी आस्थापने, २५८ डाक विभागाची कार्यालये आणि सुमारे ७०० बँकांच्या शाखा गोव्याभर पसरलेल्या आहेत. शिवाय या आस्थापनांमधील नोकऱ्यांसाठी होणाऱ्या परिक्षांच्या प्रश्नपत्रिका व प्रशिक्षणेसुद्धा कोंकणीतून देण्याची तरतूद असल्याचे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
हे व्याख्यान काणकोण कोंकणी कला केंद्र व आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजिक केले होते. यावेळी प्राचार्य हेमंत कामत यांनी स्वागत केले तर केंद्राचे सरचिटणीस सुरज कोमरपंत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कोंकणी शिक्षक अभिजीत पागी यांनी स्वागत केले तर जेष्ठ साहित्यिक कमलाकर म्हाळशी यांनी आभार प्रदर्शन केले.

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार