मुहुर्त ठरला; उद्या शपथविधी

रमेश तवडकर, दिगंबर कामत यांची मंत्रीपदी वर्णी

गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी):
राज्य मंत्रिमंडळ फेररचनेचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अखेर मोहोर उमटवली आहे. सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गांवकर यांची सभापतीपदावर निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या मंत्रिमंडळ फेररचना आणि खातेबदलाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान सभापती रमेश तवडकर आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे गुरुवारी सकाळी आपल्या पदांचे राजीनामे सादर करतील. त्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी रमेश तवडकर आणि दिगंबर कामत हे मंत्रीपदाची शपथ घेतील.
गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांचे पद गेले ६३ दिवस रिक्त होते. आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे गोविंद गावडे यांच्या जागी आदिवासी समाजाचेच नेते रमेश तवडकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांचे सभापतीपद सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गांवकर यांना दिले जाणार आहे. आदिवासी समाज दुखावला जाऊ नये, याची विशेष काळजी घेत भाजपने हे पाऊल उचलले आहे.
आलेक्स सिक्वेरांच्या जागी दिगंबर कामत
काँग्रेसमधून भाजपात आलेले लोटलीचे आमदार आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देणार आहेत. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
पूर्वी असे मानले जात होते की आलेक्स सिक्वेरांच्या जागी एखाद्या ख्रिस्ती आमदाराची नियुक्ती होईल. मात्र, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी वजनदार खात्यांची मागणी केल्यामुळे भाजपने अखेर हे पद दिगंबर कामत यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
मॉविन आणि बाबुश यांच्या मंत्रीपदांवरही नजर
मॉविन गुदीन्हो यांच्या विरोधातील वीज घोटाळ्याशी संबंधित खटल्याचा निकाल २५ ऑगस्ट २०२५ रोजी लागणार आहे. तसेच, बाबुश मोन्सेरात यांच्याविरोधात सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या खटल्याचा निकाल ३ आणि ८ सप्टेंबर २०२५ रोजी अपेक्षित आहे. या निकालांकडे भाजपचे लक्ष लागून राहिले आहे.
जर या मंत्र्यांना दोषी ठरवून दोन वर्षांहून अधिक कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली, तर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर इतर इच्छुक आमदारांची वर्णी लावण्यात येईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काही महत्वाकांक्षी आमदारांना दिल्याचे समजते.

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार