म्हाजें घर; आमदारांच्या सहीची सक्ती

अर्जदारांवर आमदारांच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ



गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी)

राज्य सरकारने तयार केलेल्या म्हाजें घर योजनेचा निवडणुकांत लाभ करून घेण्याचा सरकारचा इरादा आता स्पष्ट झाला आहे. आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने या योजनेच्या अर्जांवर विशेष तयार केलेला शिक्का मारून त्यावर अर्जदाराचा फोटो आणि आमदाराची सही घेण्याची सक्ती करण्यात आल्याने हा विषय चर्चेत आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून कार्यवाही
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हाजें घर योजनेच्या प्रचारासाठी घेतलेला पुढाकार हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच असल्याची स्पष्ट खात्री आता सर्वांना झाली आहे. पहिल्या सहा महिन्यांत केवळ अर्जांचा स्वीकार करून पुढील सहा महिन्यांत सनद वाटपाचे नियोजन सरकारने केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या चार ते पाच महिन्यांपूर्वी लोकांना घरांच्या मालकीच्या सनद वाटप करून त्याचा थेट लाभ मतदान यंत्रातून भाजपला मिळवण्याचा पक्षाचा डाव असल्याचे सरकारच्या कृतीवरून दिसून येते. हे अर्ज नेणारी प्रत्येक व्यक्ती आमदारापुढे यावी, या उद्देशाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या तोंडी आदेशावरून एक खास शिक्का तयार करण्यात आला आहे. त्या शिक्क्याच्या ठिकाणी अर्जदाराने आपला फोटो चिकटवून तो आमदारामार्फत प्रमाणित करण्याची सक्ती करण्यात आली आहे.
अर्जदारांची ससेहोलपट
मुळात तालुका उपजिल्हाधिकारी कार्यालयातून हे अर्ज घेण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागते. तिथून फोटो काढून तो चिकटवून हे अर्ज आमदारांकडे पाठवावे लागतात. भाजप आमदारांनी हे अर्ज भरून देण्याची तसेच काही आमदारांनी फोटोसह सही करून हे अर्ज अर्जदारांच्या घरी पोहोचवण्याचीही व्यवस्था केली आहे. या योजनेचा पूर्णतः राजकीय लाभ करून घेण्याचा भाजपचा खटाटोप असल्याचे या एकूणच प्रकारावरून उघड झाले आहे.

पक्षबदलू नकोच
आघाडी घटकांना आरजीपीचा इशारा
गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी)

गोव्याच्या राजकारणाचे नुकसान केलेल्या पक्षबदलूंना पुन्हा प्रवेश देण्याबाबत आरजीपी पक्षाचा सक्त विरोध आहे. नव्या नेतृत्वाला एक नवी सुरूवात करून देण्यासाठी आघाडीच्या घटकांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी केली. पक्षबदलूंच्या फेरप्रवेशाबाबत आघाडीच्या घटकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले.
आरजीपीचे आमदार विरेश बोरकर आणि खजिनदार अजय खोलकर यांच्यासोबत पत्रकार परिषदेत मनोज परब यांनी ही माहिती दिली. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, ही गोमंतकीयांची भावना आहे. ही आघाडी केवळ निवडणुकीसाठी नसून गोव्याला नवी दिशा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
आघाडीचे निमित्त करून आपल्या पक्षाचा विस्तार करणे, सहकारी पक्षांवर कुरघोडी करणे किंवा एकमेकांना कमी लेखून आघाडीचा राजा बनण्याचा खटाटोप करणे हे प्रकार आक्षेपार्ह आहेत. अंतर्गत राजकारणावर काहीजणांचा भर असल्याने अशा परिस्थितीत ही आघाडी टिकवणे कठीण ठरेल.
आरजीपीने गोव्याच्या भल्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून घेतले आहे. त्यांना गोव्यासाठी तडजोड आणि त्याग करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. अशा वेळी आघाडीतील अन्य घटकांनी आपले राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यास तो आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात ठरेल. त्यामुळे आघाडीच्या घटकांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करणेच उचित ठरेल, असे मनोज परब म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    मडगाव – “श्री गणेश पॅंडल स्कॅंडल प्रकरणापासून ते आकें रिंग रोडवरील श्री गणेश मंदिराबाहेर समाजकंटकांचा अड्डा तयार करण्यापर्यंत, पक्षबदलू आमदार व सार्वजनीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी आता सर्व मर्यादा…

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    Panaji: A site inspection conducted by the Goa Coastal Zone Management Authority (GCZMA) in connection with Delta Pleasure Cruise Company Pvt. Ltd.’s proposal to operate a new vessel, M.V. Deltin…

    You Missed

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    Objection Filed Against Tillari Command Area Denotification in Dhargalim

    Objection Filed Against Tillari Command Area Denotification in Dhargalim

    FIR Registered in Ponda Land Grabbing CaseAllegations of Forged TCP NOCs and Illegal Sale Deeds

    FIR Registered in Ponda Land Grabbing CaseAllegations of Forged TCP NOCs and Illegal Sale Deeds

    25/03/2026 e-paper

    25/03/2026 e-paper