मतपत्रिकांतून जिल्हा पंचायतींचा फैसला

२० डिसेंबर रोजी मतदान, २२ रोजी निकाल



गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी)

राज्यातील ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे, तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयुक्त मेनिनो डिसोझा यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. देशभरात मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त केला जात असताना, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील मतदार मतपत्रिकेद्वारे मतदान करणार असल्याने या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
राज्यात आचारसंहिता लागू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रमही आयोगाने जाहीर केला आहे. १९९७ साली राज्यात जिल्हा पंचायतींसाठी पहिली निवडणूक झाली होती. यंदाची निवडणूक ही जिल्हा पंचायतींसाठीची सातवी सार्वत्रिक निवडणूक ठरणार आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा मिळून प्रत्येकी २५ असे एकूण ५० मतदारसंघ आहेत. राज्यातील सुमारे ११.८५ लाख मतदारांपैकी ८.६८ लाख मतदार जिल्हा पंचायत निवडणुकीत सहभागी होणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर लढवल्या जात असल्याने ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही प्रतिष्ठेची ठरणार आहे.
मतदानयंत्रांच्या गैरवापराबाबत विरोधक सातत्याने आरोप करीत असतात. जिल्हा पंचायत निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे मतदानाची संधी उपलब्ध झाल्याने, या निकालांच्या आधारे मतदानयंत्रांबाबतचा वाद पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

जिल्हा पंचायत निवडणूक – २०२५
एकूण मतदारसंघ
मतदारसंघ
उत्तर गोवा २५
दक्षिण गोवा २५
एकूण ५०


एकूण मतदार
उत्तर गोवा
वर्ग संख्या
पुरुष २,१३,५२९
महिला २,२५,९४८
इतर
एकूण ४,३९,४८०
दक्षिण गोवा
वर्ग संख्या
पुरुष २,०६,९०२
महिला २,२२,२५३
इतर
एकूण ४,२९,१५७
दोन्ही जिल्ह्यांतील एकूण मतदार
वर्ग संख्या

पुरुष ४,२०,४३१
महिला ४,४८,२०१

इतर 5
एकूण ८,६८,६३७


एकूण मतदान केंद्रे (बुथ)
विभाग बुथ
उत्तर गोवा ६५८
दक्षिण गोवा ६२६
एकूण १,२८४


आरक्षण
उत्तर गोवा
आरक्षण प्रकार संख्या
महिला
ओबीसी
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
दक्षिण गोवा
आरक्षण प्रकार संख्या
महिला १०
ओबीसी
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती


निवडणूक वेळापत्रक
प्रक्रिया दिनांक / वेळ
उमेदवारी अर्ज भरणे १ ते ९ डिसेंबर २०२५ (सकाळी १० ते दुपारी १)
अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ३ डिसेंबर (सार्वजनिक सुट्टी), ७ डिसेंबर (रविवार)
अर्जांची छाननी १० डिसेंबर २०२५ (सकाळी १० पासून छाननी पूर्ण होईपर्यंत)
अर्ज मागे घेणे ११ डिसेंबर २०२५ (सकाळी १० ते दुपारी २)
अंतिम यादी जाहीर ११ डिसेंबर २०२५ (दुपारी २ नंतर)
मतदान २० डिसेंबर २०२५ (सकाळी ८ ते संध्याकाळी ५)
मतमोजणी २२ डिसेंबर २०२५ (सकाळी ८ पासून पूर्ण होईपर्यंत)
उमेदवार खर्च मर्यादा ₹५,००,०००
मतदान पद्धत मतपत्रिकेद्वारे

उत्तर गोवा मतदारसंघ
हरमल, मोरजी, धारगळ, तोरसे,
शिवोली, कोलवाळ, हळदोणा, शिरसई, हणजूण, कळंगुट, सुकूर, रेईश-मागोश, पेन्हा दी फ्रान्स
सांताक्रुझ, ताळगांव, चिंबल, खोर्ली, सेंट लॉरेन्स
लाटंबार्से, कारापूर-सर्वण, मये, पाळी,
होंडा, केरी, नगरगांव

दक्षिण गोवा मतदारसंघ
उसगांव- गांजे, बेतकी- खांडोळा, कुर्टी, वेलिंग-प्रियोळ, कवळे, बोरी, शिरोडा
राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली, दवर्ली, गिर्दोळी, कुडतरी, नावेली,
सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, बार्से, खोला, पैंगिण, सांकवाळ, कुठ्ठाळी

  • Related Posts

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Panaji: The Goa Pradesh Mahila Congress has extended support to victims and families affected by the alleged Curchorem sex scandal, raising serious concerns over institutional gaps and the lack of…

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ८०, ९२६ चौ. मीटर झोन बदलासाठी शिफारस गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) नगर नियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम ३९(ए) अंतर्गत आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील ८०,९२६ चौ. मीटर…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…