माझे घर; कार्लूस फॅरेराही भारावले !

नास्नोळ्यातील कार्यक्रमात सरकारचा जयजयकार


गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी):
राज्य सरकारने अनधिकृत व बेकायदा घरे नियमित करण्यासाठी तयार केलेल्या माझे घर योजनेच्या अर्ज वितरणास प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यभरात अर्ज वितरण कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे. या कार्यक्रमांमुळे विचलित झालेले काँग्रेसचे आमदारही आता गळाला लागले आहेत.
विरोधी काँग्रेस पक्षाचे आमदार अ‍ॅड. कार्लूस फॅरेरा हे सोमवारी नास्नोळा पंचायत क्षेत्रात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा पूर्णतः मुखभंग झाला असून सोशल मीडियावरून काँग्रेसची टर उडवली जात आहे.
भाजपसाठी माझे घर योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी संपूर्ण राज्यभरात या योजनेचा डंका पिटण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून अर्ज वितरणाचे कार्यक्रम विविध मतदारसंघांत आयोजित केले जात आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमांना लोकांची मोठी गर्दी होत असून विरोधक धास्तावले आहेत.
हळदोण्याचे आमदार अ‍ॅड. कार्लूस फॅरेरा हे उघडपणे माझे घर योजनेच्या अर्ज वितरण कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे काँग्रेसची बरीच नाचक्की झाली आहे. विधानसभेत त्यांनी या विधेयकांना आक्षेप घेतला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेतूनही त्यांनी या योजनेवर टीका केली होती. आता अर्ज वितरण कार्यक्रमात सहभागी होऊन भाजपच्या जयजयकारात वाटेकरी झाल्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे.
आमदार कार्लूसच्या कृतीमुळे काँग्रेस अडचणीत
हळदोण्याचे आमदार अ‍ॅड. कार्लूस फॅरेरा यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. यापूर्वी कुडचडे मतदारसंघाचे आमदार निलेश काब्राल यांच्या वाढदिनी सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर नाराज झाले होते. त्यांनी यासंबंधी तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र पक्षश्रेष्ठींना पाठवले होते.
आता राज्यात माझे घर योजनेविरोधात काँग्रेस सरकारवर टीका करत असताना पक्षाचे आमदार सरकारसोबत कार्यक्रमात सहभागी झाल्याने पाटकर यांची अधिकच कोंडी झाली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेण्याची रणनिती भाजपने आखल्याची माहिती आहे.
आपच्या हाती कोलीत
काँग्रेसविरोधी भूमिकेमुळे आम आदमी पार्टीमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू असतानाच आता आमदार अ‍ॅड. कार्लूस फॅरेरा यांच्या भूमिकेमुळे भाजप आणि काँग्रेसच्या साटेलोट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आपच्या हाती नव्याने कोलीत सापडले आहे.
योजनेच्या विरोधात, पण मालकीच्या समर्थनात
माझे घर योजना कायदेशीरदृष्ट्या अयोग्य असून त्यात सुधारणा करण्याची शिफारस आपण विधानसभेत केली होती. या योजनेला आक्षेप घेतल्याचा अर्थ लोकांची घरे नियमित किंवा कायदेशीर होण्यात विरोध आहे, असा नाही. सरकारी योजनेतून जर घरे नियमित होत असतील तर त्याचे स्वागतच आहे. कायद्याचा विषय न्यायालयात निकाली निघेल आणि त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. कार्लूस फॅरेरा यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली.

  • Related Posts

    Over 50 Goa University Students Face Academic Uncertainty as Supreme Court Order Sparks Examination Fee Deadline Row

    More than 50 students at Goa University reportedly face academic uncertainty after being declared ineligible for examinations due to unpaid fees, following a Supreme Court observation against treating exceptional relief as a precedent. The university has reportedly stopped accepting late examination fees, citing the Supreme Court’s stance.

    South Goa Collector Announces Special Camp to Clear Pending Land Mutation Cases on October 24

    Margao, October 22: In a move to expedite the disposal of pending land mutation cases, the South Goa District Administration has announced a special camp on Saturday, October 24, 2026, across Salcete, Ponda and Mormugao talukas.

    You Missed

    Over 50 Goa University Students Face Academic Uncertainty as Supreme Court Order Sparks Examination Fee Deadline Row

    Over 50 Goa University Students Face Academic Uncertainty as Supreme Court Order Sparks Examination Fee Deadline Row

    South Goa Collector Announces Special Camp to Clear Pending Land Mutation Cases on October 24

    South Goa Collector Announces Special Camp to Clear Pending Land Mutation Cases on October 24

    Goa Unveils AI Policy 2026; CM Sawant Pushes for AI-Ready Education and Governance

    Goa Unveils AI Policy 2026; CM Sawant Pushes for AI-Ready Education and Governance

    राष्ट्रध्वजारोहणाचा मान राजकारण्यांऐवजी स्वातंत्र्यसैनिक, सैनिकांना द्या!

    राष्ट्रध्वजारोहणाचा मान राजकारण्यांऐवजी स्वातंत्र्यसैनिक, सैनिकांना द्या!

    आसगांव पंचायतीला हायकोर्टाचा धक्का

    आसगांव पंचायतीला हायकोर्टाचा धक्का

    22/10/2026 e-paper

    22/10/2026 e-paper