महालयारंभ; सरकारची डोकेदुखी वाढलीमंत्री, आमदारांत प्रशासनाबद्दल नाराजी

पणजी,दि.१९(प्रतिनिधी)- एकीकडे भूतानी प्रकल्पावरून सरकारात अस्वस्थता पसरली असतानाच आता सरकारातील आमदार,मंत्री आपल्याच सरकारच्या कार्यपद्धतीवरून एकमेकांवर टीका करू लागल्यामुळे भाजपात बेशिस्तीने डोके वर काढले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सगळ्या आमदारांना ताकिद दिली असली तरी सत्य बोलणे हे बेशिस्ती ठरते काय,असा सवाल करून आता काही आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रकल्पाचा फेरआढावा घेणार

नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांकवाळ येथील भूतानी प्रकल्पाच्या सगळ्या परवान्यांचा फेरआढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुरगांव नगर नियोजन प्राधीकरणाने दिलेल्या परवान्याची नव्याने पडताळणी केली जाईल. या प्रकल्पाची जागा डोंगरपट्टा असूनही तिथे पीडीएमध्ये हे क्षेत्र व्यवसायिक म्हणून कसे काय अधिसूचित झाले,असाही सवाल उपस्थित झाला आहे. प्रत्यक्षात जागेची सद्यस्थिती आणि पीडीएमध्ये झालेली जमीन वापराची अधिसूचना याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाणार अशी माहिती विश्वजीत राणे यांनी दिली.

रस्त्याचे खड्डे, वाहतुक पोलिस, पाणी आणि बरंच काही.

वाहतुक पोलिसांकडून पर्यटकांची सतावणूक केली जाते हा विषय सातत्याने विधानसभेत मांडूनही काहीच उपयोग होत नसल्याने कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी आज पोलिस महासंचालकांची भेट घेतली. काहीही कारण नसताना पर्यटकांना रस्त्यावर ताटकळत ठेवले जाते. अशाने गोव्याचे पर्यटन बदनाम होणार अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालीच नाही,असेही ते म्हणाले.रस्ते अपघात हा चिंतेचा विषय ठरू लागला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांनी जनता त्रस्त आहे आणि वीज, पाण्यासाठीही लोकांना रस्त्यावर उतरावे लागते हे सरकारसाठी चांगले नाही,अशी भूमिका यावेळी लोबो यांनी मांडली.

सत्य म्हणजे बेशिस्ती ठरते काय?

एखाद्या विषयावरून जेव्हा योग्य निर्णय घेतले जात नाही तेव्हा ती समस्या जटिल बनते आणि सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. रस्त्यांच्या परिस्थितीवरून आधीच जनता संतप्त बनली आहे, त्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्य ते सहकार्य वाहतुक खात्याला मिळत नाही. याबाबत वाहतुकमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी नाराजी व्यक्त केलेली भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांना अजिबात रूचली नाही. पक्षात आता खरे बोलणे देखील उरलेले नाही. खरे बोलणे हे बेशिस्तीत पडते काय,असा सवाल आता नेते आणि कार्यकर्ते खाजगीत बोलू लागले आहेत.

  • Related Posts

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    टीकाकारांच्या तोंडाला कायदेशीर कुलुप पणजी,दि.२१(प्रतिनिधी)- सनबर्न महोत्सवाचे आयोजक स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा.लिमिटेड कंपनीकडून स्थानिक धारगळ पंचायतीचा ना हरकत दाखला. पर्यटन खात्याची तत्वतः मान्यता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून सशर्त…

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    खाते विश्वजीतांकडे, सेवावाढीची मेहरनजर मुख्यमंत्र्यांची पणजी,दि.२०(प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याचे मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांच्या सेवावाढीला नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांना जबाबदार धरले जाते. परंतु प्राप्त माहितीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    21/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 8 views
    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 8 views
    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 5 views
    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 6 views
    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 9 views
    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!