२ बडतर्फ, २ निलंबित, १ एफआयआर

सत्तरीतील राणे कुटुंबीयांत खळबळ

गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी)

आरोग्य, नगर विकास, नगर नियोजन आणि वनखाते सांभाळणारे वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी त्यांच्याच अखत्यारित खात्यांमध्ये कठोर शिस्तबदधता आणण्यास सुरूवात केली आहे. या महिन्यात त्यांनी त्यांच्या विविध खात्यांतील एकण चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करून याची सुरूवात केली आहे. दोघांचे निलंबित तर दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व कर्मचारी सत्तरीतील राणे कुटुंबातीलच असल्याने आपल्याच कुटुंबातून या मोहीमेला सुरूवात केली की काय, अशी चर्चा आता सर्वंत्र सुरू झाली आहे.

कारवाईची तपशीलवार माहिती

५ मे २०२५ रोजी आरोग्य खात्याअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अन्न निरीक्षक विश्वासराव लक्ष्मणराव राणे यांना निलंबित करण्याचा आदेश संचालक श्वेता देसाई यांनी जारी केला. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असून सेवेत हलगर्जीपणाचा आरोप आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांच्यावर केला आहे.

६ मे २०२५ रोजी गोवा वैदयकीय महाविदयालयात एमटीएस म्हणून कार्यरत असलेले धनाजीराव जयाजीराव राणे यांना निलंबित करण्यात आले. मात्र, त्यांच्या निलंबनाच्या आदेशात कोणतेही स्पष्ट कारण दिले गेले नाही.

त्याच दिवशी गोवा वैद्यकीय महाविदयालयातील ईसीजी तंत्रज्ञ साईली मोहनराव राणे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ अपूर्वा अनंतराव राणे या दोघींना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश जारी करण्यात आला. हा आदेश गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिला. त्यांच्या बडतर्फीमागचे कारणही अस्पष्ट आहे.
अमित बापूसाहेब राणे यांच्या विरोधात एफआयआर

६ मे रोजी वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत वाघेरीची जमीन वन्यजीव क्षेत्र म्हणन घोषित करण्याचा सरकारचा विचार असल्याचे स्पष्ट केले. याच वेळी, वाघेरी येथे बेकायदा रस्ते तयार करण्याच्या प्रकरणी अमित राणे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश वन अधिकाऱ्यांना देण्यात आले. अमित बापुसाहेब राणे हेही सत्तरीतील राणे कुटुंबातील सदस्य असल्याने, विश्वजीत राणे यांच्या अखत्यारीतील खात्यांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांवर झालेल्या कारवाईमुळे सरकारमध्ये आणि तालुक्यात हा विषय मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Related Posts

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Indian squash player Yash Fadte reached the quarterfinals of the PSA Aramis Club Open in Belgium, demonstrating resilience in a grueling five-game battle against Scottish No. 1 John Meehan, following a remarkable comeback victory in the pre-quarterfinals.

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    मडगावातील प्रस्तावित बहुमजली पार्किंग प्रकल्पाच्या पायाभरणीला ११ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत ‘मडगांवचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. कोसळलेल्या शिलान्यास फलकाला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या प्रकल्पाला ‘अपयशाचे स्मारक’ असे संबोधले.

    You Missed

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 18, 2026
    • 13 views
    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 18, 2026
    • 11 views
    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    1526–2026: 500 Years of the Foral

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 16, 2026
    • 20 views
    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 14, 2026
    • 31 views
    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 14, 2026
    • 27 views
    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 12, 2026
    • 35 views
    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM