कर्मयोगी: भाऊसाहेब बांदोडकर

गोव्याच्या भूमीत जन्मला, हिरा एक अनमोल, भाऊसाहेब बांदोडकर, नाव त्यांचे, कर्तृत्व ज्यांचे थोर, स्वतंत्र गोव्याचे शिल्पकार ,प्रथम मुख्यमंत्री महान.
जनतेचा आधार बनुनी, दिले आधुनिकतेचे वरदान.

सिंहापरी नेतृत्व त्यांचे, हिमालयासम उंची,
कर्णासम दातृत्व त्यांचे, मायेची जणू ती कुंची.
बहुगुणानी सजलेले, जीवन लोकांप्रती अर्पण, लोकप्रियता अपार त्यांची, समाजासाठी केले कल्याण.

लोकशाहीचा अर्थ खरा, भाऊसाहेबांनी दाखविला, हार-जीत न मानता, जनमताचा कौल स्वीकारला.
प्रतिभगीरथ बनुनी, शिक्षणाची गंगा आणिली.
ज्ञानाची दारे उघडली, प्रगतीची वाट दाखविली.

बहुजनांचा कैवारी, असे नाव त्यांनी कमविले, शेतकऱ्यांसाठी जीवन त्यांचे, समर्पित असे राहिले,
त्यांच्या स्मृतीचा जागर, सदैव मनात राहिल.
भाऊसाहेबांच्या कार्याचा दिप तेवत राहील.

  • दत्ताराम भोज्जी
  • Related Posts

    मायेची सावली हरपली…

    जीवनाच्या प्रवासात काही माणसे अशी असतात की, त्यांची उपस्थिती मोठ्या आवाजात कधी जाणवत नाही; पण त्यांच्या अस्तित्वामुळे संपूर्ण कुटुंब, संसार आणि अनेकांची आयुष्ये शांतपणे उजळलेली असतात. त्या स्वतः प्रकाशझोतात नसतात;…

    गोव्याला जबाबदार विरोधकांची गरज

    पक्षनिष्ठेपेक्षा भूमीनिष्ठा मोठी मानून प्रत्येक गोमंतकीयाने एकच प्रश्न विचारला पाहिजे, खरोखर गोव्यासाठी कोण उभे आहेत ? लोकशाही केवळ निवडणुकांवर टिकत नाही. ती टिकते जबाबदारीवर, जागरूकतेवर आणि सत्तेला प्रश्न विचारण्याच्या धैर्यावर.…

    You Missed

    Private Bus Owners Urge CM to Resolve Long-Pending Demands, Raise Concerns Over Kadamba EV Buses and Poor Bus Stand Facilities

    Private Bus Owners Urge CM to Resolve Long-Pending Demands, Raise Concerns Over Kadamba EV Buses and Poor Bus Stand Facilities

    वाडे-कुर्डी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जीएसएससी परीक्षांसाठी मोफत कोचिंग

    वाडे-कुर्डी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जीएसएससी परीक्षांसाठी मोफत कोचिंग

    सुर्लातील खाण भरपाईचे राजकारण ?

    सुर्लातील खाण भरपाईचे राजकारण ?

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    मायेची सावली हरपली…

    मायेची सावली हरपली…

    गोव्याला जबाबदार विरोधकांची गरज

    गोव्याला जबाबदार विरोधकांची गरज