पैसे घेऊन “म्हाजें घर” योजनेला आव्हान !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विरोधकांवर निशाणा

गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी)

म्हाजें घर योजनेमुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. काही व्यक्तींच्या पाठिंब्याने पैसे घेऊन न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या योजनेविरोधात कुणी कितीही आदळआपट केली तरी सरकार कोणत्याही दबावाला बळी न पडता ही योजना यशस्वी करून दाखवणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हाजें घर योजना आणि महसूल सुधारणा या विषयावर आज थेट संवाद साधला. ही योजना लागू झाल्यापासून अनेक विषय पुढे आले असून त्यानुसार योजनेत सुधारणा आणि दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंडकारांना सुरक्षा कवच
राज्यात अनेक ठिकाणी मुंडकारांच्या नकळत किंवा त्यांचा विषय निकाली न काढता भाटकारांकडून परस्पर जमिनी विकल्या जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मुंडकारांना मालकी हक्क दिल्याशिवाय भाटकारांना जमिनी विकता येणार नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. राज्यात जमिनीच्या किंमती वाढल्याने भाटकार मुंडकारांना फसवून जमिनी विकू लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मोकासो, आल्वारा अतिक्रमणकर्त्यांनाही दिलासा
राज्यातील आल्वारा आणि मोकासो जमिनींवरील अतिक्रमणे तसेच घरांना अधिकृत दर्जा दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, सरकारी आणि कोमुनिदाद जमिनींवरील अनधिकृत घरे कायदेशीर करण्याची ही शेवटची संधी लोकांना मिळणार आहे. लोकांनी या सहा महिन्यांतच याचा लाभ घ्यावा. ही योजना पुन्हा जारी केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खाजगी सोसायट्यांना दिलासा
खासगी सोसायट्यांमधील फ्लॅटधारकांसाठी सोसायटीच्या जमिनी त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात अनेक अडचणी येत आहेत. ही प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत केली जाणार आहे. घर क्रमांकाचे विभाजन झालेल्यांना स्वतंत्र शौचालयांसाठी अर्ज करण्याची मुभा दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. रक्कसंबंधामध्ये जमिनीचे हस्तांतरण केवळ ५ हजार रुपये शुल्क आकारून केले जाणार आहे.
गृहनिर्माण घरांची मालकी
गोवा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या घरांना मालकी हक्क देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित घर मिळवून देणे हेच सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वार्कात मायावतीच्या भावाची जमीन

गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी)

सासष्टी तालुक्यातील वार्का-फात्राडे येथील सर्वे क्रमांक १२६/० ही ५०,२७५ चौ.मी. जमीन उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे बंधू आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नी विचितेर लता यांनी विकत घेतल्याचे समोर आले आहे. या जमिनीत जाण्यासाठी पंचायतीकडून रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी ही माहिती दिली. वार्का पंचायतीने या रस्त्यासंबंधी एक ठराव मंजूर करून हे काम हाती घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य रस्त्यावरून थेट किनाऱ्यावर जाण्यासाठी या रस्त्याचे बेकायदा काम सुरू झाल्यानंतर स्थानिकांनी आक्षेप घेतला. ही जागा सीआरझेड क्षेत्रात येते. येथे वाळूचे पट्टे असून त्याचेही नुकसान करण्यात आले आहे. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने या बेकायदा कामाची दखल घेऊन पाहणी करून अहवाल सादर केला आहे.

  • Related Posts

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    खाजगी बस मालक आंदोलनाच्या पवित्र्यात गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) राज्यातील खासगी बस मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे…

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत पारदर्शकता राखण्याची आणि नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी केली. जुन्या बसस्थानकाच्या पुनर्विकासाबाबत घाईघाईने निर्णय न घेता जनमत घ्यावे आणि स्मार्ट सिटीअंतर्गत मूलभूत प्रश्न सोडवावे अशी त्यांची मागणी आहे.

    You Missed

    PwD Reservation Rights Complaint: Gadekar Seeks Urgent Intervention from State Commissioner

    PwD Reservation Rights Complaint: Gadekar Seeks Urgent Intervention from State Commissioner

    22/06/2026 e-paper

    22/06/2026 e-paper

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती