संयमी डॉक्टरांची कबुली

राणे यांची महत्वाकांक्षा मुख्यमंत्रीपदाची असली तरी त्यांचा स्वभाव आणि वागणूक त्यांना या पदापासून दूर लोटत आहेत. नगर नियोजन खात्याचा कारभार पाहून लोक “सावंत परवडले, पण विश्वजीत नको” असे बोलू लागले आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठी देखील त्यांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करतात.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचे सर्वांत मोठे यश हे त्यांच्या संयमी वृत्तीत आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही. गेली सात वर्षे ते सत्तेत असून, विधानसभा आणि सभागृहाबाहेरही त्यांनी संयम राखला आहे. विरोधकांच्या प्रक्षोभक टीका आणि आरोपांनाही ते शांतपणे सामोरे जातात. त्यांच्या या गुणांमुळे विरोधक आणि टीकाकार अनेकदा थकून जातात.
मिराबागवासीयांच्या निदर्शनावेळी “त्यांना अटक करा, आत टाका” असे विधान केल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र “मी त्यांना थेट दहशतवादी म्हटले नाही, तर या प्रवृत्तीवर बोललो” असे स्पष्ट करून, यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे त्यांनी सांगितले. ही प्रांजळ कबुली त्यांच्या संयमी वृत्तीचे दर्शन घडवते.
राजकीय नेत्यांवर लोक वेगवेगळ्या कारणांनी टीका करतात. काहीजण राजकीय विरोधक म्हणून टीका करतात, काहीजण वैयक्तिक नापसंतीतून आरोप करतात, तर काहीजण चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवतात. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यावर अजूनही टीका होत असताना डॉ. सावंत यांची टीका होणे मोठे नाही. मात्र त्यांच्या संयमी स्वभावामुळे टीकाकारच लोकांच्या टीकेचे धनी बनतात.
एकीकडे डॉ. सावंत यांचा संयमी स्वभाव तर दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा शीघ्रकोपी स्वभाव. राणे यांची महत्वाकांक्षा मुख्यमंत्रीपदाची असली तरी त्यांचा स्वभाव आणि वागणूक त्यांना या पदापासून दूर लोटत आहेत. नगर नियोजन खात्याचा कारभार पाहून लोक “सावंत परवडले, पण विश्वजीत नको” असे बोलू लागले आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठी देखील त्यांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करतात.
स्वभाव आणि व्यसन हे सहज दूर करता येत नाही. ते व्यक्तीशी इतके जोडलेले असतात की बदल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आत्मसंयम आणि वेदना सहन कराव्या लागतात. मुख्यमंत्री डॉ. सावंत मात्र न चुकता साखळी रविंद्र भवन येथे जनता दरबार भरवतात. असा दरबार अन्य कुणीही मंत्री भरवत नाही. लोकांच्या रांगा कायम लागलेल्या असतात. कामे झाली नाहीत तरी “आपले गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले” यामुळे लोकांना समाधान मिळते. ही लोकाभिमुख वृत्ती त्यांना जनतेच्या जवळ नेते. मिराबागवासीयांची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी माफी मागितलीच आहे. आता त्यांच्या आंदोलनाचा विषय लवकरात लवकर निकालात काढून त्यांच्या आक्रोशाला पूर्णविराम द्यावा, एवढीच अपेक्षा आहे.

  • Related Posts

    भाजपचे डबल स्टॅंडर्ड राजकारण

    एकीकडे सेंट फ्रान्सिस झेवियरला धर्मांतर आणि छळाच्या विषयांवरून दोष द्यायचा आणि जुने गोवेतील शवदर्शन सोहळ्यानिमित्त कोट्यवधींची कंत्राटे काढून त्यातून कमिशन खायचे ही भाजपची नीतीच बनली आहे. भाजप सध्या राष्ट्रीय आणि…

    एका शिपायाचे कारनामे

    हा शिपाईच म्हणे पेडणे जलस्त्रोत खाते चालवतो. या शिपायाची ताकद इतकी की तो जिथे बोट ठेवेल तिथे म्हणे वरिष्ठ अधिकारी डोळे बंद करून सही करतात. जनतेला वेगवेगळ्या इव्हेंट, कार्यक्रम, मेळावे…

    You Missed

    Centre Grants Approval for Goa Veterinary College at Ponda

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2026
    • 7 views
    Centre Grants Approval for Goa Veterinary College at Ponda

    GMC Issues Notice Over Illegal LPG Parking in Residential Quarters

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2026
    • 8 views
    GMC Issues Notice Over Illegal LPG Parking in Residential Quarters

    भाजपचे डबल स्टॅंडर्ड राजकारण

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2026
    • 10 views
    भाजपचे डबल स्टॅंडर्ड राजकारण

    28/04/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2026
    • 13 views
    28/04/2026 e-paper

    खाजगी कार्यालयात कांजिण्याची साथ

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2026
    • 16 views
    खाजगी कार्यालयात कांजिण्याची साथ

    Bethora Land Fraud Case: TCP Middleman Arrested, Fake NOCs Used for Illegal Transactions

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2026
    • 19 views
    Bethora Land Fraud Case: TCP Middleman Arrested, Fake NOCs Used for Illegal Transactions