‘पार्सेकर फुड्स’ विरोधात आज महाआंदोलन


गांवकारी, दि.१४ (प्रतिनिधी)
धारबांदोडा तालुक्यात सावर्डे मतदारसंघातील पळसकट्टा गावात ‘पार्सेकर फुड्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या फूड रेंडरिंग प्लांटविरोधात आज महाआंदोलनाचे आयोजन केले आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे ग्रामस्थ संतप्त बनले आहेत. या सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असून, ठोस कारवाई होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
तपासणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मज्जाव
स्थानिकांच्या तक्रारीनंतर पंचायत मंडळ आणि संबंधित सरकारी अधिकारी पाहणीसाठी पळसकट्टा येथे पोहोचले. मात्र, कंपनी मालकाने तक्रारदारांना आत प्रवेश नाकारल्याने पाहणी होऊ शकली नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी जानेवारी महिन्यातही अधिकाऱ्यांना अशाच प्रकारे माघारी पाठवण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात.
पोल्ट्री शेडच्या नावाखाली रेंडरिंग प्लांट?
उपलब्ध माहितीनुसार, सदानंद पार्सेकर यांनी २०१२ मध्ये मोले पंचायतीकडून सर्व्हे क्र. ३३(१) मध्ये पोल्ट्री शेड, स्टोअर रूम आणि लेबर रूमच्या बांधकामासाठी ना हरकत दाखला मिळवला होता. २०१५ मध्ये ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घेऊन व्यवसाय सुरू झाला. जून २०२० मध्ये ‘पार्सेकर फुड्स प्रायव्हेट लिमिटेड’ची स्थापना झाली, ज्यामध्ये प्रभाजन पार्सेकर (एमडी) आणि सुनिता पार्सेकर (डायरेक्टर) म्हणून कार्यरत आहेत. कंपनीचा नोंदणीकृत पत्ता बेतोडा फोंडा येथे आहे. २०२१ मध्ये चिकन पुरवठ्याचा व्यवसाय सुरू झाला, तर २०२३ मध्ये ‘पोल्ट्री वेस्ट रेंडरिंग प्लांट’ उभारण्यात आला. तेव्हापासूनच परिसरात दुर्गंधी पसरल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आरोग्याचा प्रश्न आणि राजकीय वरदहस्त
या प्लांटमुळे परिसरातील २५-३० घरांतील सुमारे १५० ग्रामस्थांना उग्र वासाचा त्रास होत आहे. वर्षभर पंचायतीकडे पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. पार्सेकर यांना फोंडा तालुक्यातील एका बड्या मंत्र्याचा आणि सावर्डे मतदारसंघातील एका प्रबळ नेत्याचा पाठिंबा असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. संबंधित नेता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या तिकिटाचा दावेदार असल्याची चर्चा आहे. या राजकीय ‘अभया’मुळेच अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे.
प्रक्रियेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह
कंपनीची वेस्ट रेंडरिंग क्षमता दिवसाला १६ टन इतकी आहे. दिवसाला जवळपास ५ हजार कोंबड्या कापल्या जातात. दक्षिण गोव्यातील सर्व वेस्ट येथे आणून प्रक्रिया करण्याची परवानगी कंपनीकडे असल्याचे समजते. मात्र, प्रत्यक्ष किती कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते याबाबत स्थानिकांनी शंका व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पोल्ट्री वेस्टची जबाबदारी व्यावसायिकांनी घ्यावी, अशी सूचना झाल्यानंतर हा प्लांट अस्तित्वात आल्याची माहिती आहे.

  • Related Posts

    Tuem Panchayat Backs ‘Enough is Enough’ Movement, Raises Alarm Over Villa Projects

    Tuem, Pernem: In a significant development reflecting growing grassroots concern, the Tuem Village Panchayat has passed a resolution extending its support to the ‘Enough is Enough’ movement. The resolution was…

    Alleged Illegal Tree Felling at Mollem Raises Serious Environmental Concerns

    Mollem, Goa:A major controversy has erupted in Mollem after allegations surfaced that large-scale tree cutting has been carried out on Survey No. 24 by a company identified as Agarwal, reportedly…

    You Missed

    Tuem Panchayat Backs ‘Enough is Enough’ Movement, Raises Alarm Over Villa Projects

    • By Gaonkaari
    • एप्रिल 14, 2026
    • 8 views
    Tuem Panchayat Backs ‘Enough is Enough’ Movement, Raises Alarm Over Villa Projects

    Alleged Illegal Tree Felling at Mollem Raises Serious Environmental Concerns

    • By Gaonkaari
    • एप्रिल 14, 2026
    • 9 views
    Alleged Illegal Tree Felling at Mollem Raises Serious Environmental Concerns

    14/04/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 14, 2026
    • 15 views
    14/04/2026 e-paper

    कामगारांच्या आयुष्याकडे खेळ नको

    • By Gaonkaari
    • एप्रिल 14, 2026
    • 17 views
    कामगारांच्या आयुष्याकडे खेळ नको

    ‘पार्सेकर फुड्स’ विरोधात आज महाआंदोलन

    • By Gaonkaari
    • एप्रिल 14, 2026
    • 16 views
    ‘पार्सेकर फुड्स’ विरोधात आज महाआंदोलन

    Fake Loan Call Centre Busted in Goa; 7 Arrested in Midnight Cyber Crime Raid

    • By Gaonkaari
    • एप्रिल 14, 2026
    • 11 views
    Fake Loan Call Centre Busted in Goa; 7 Arrested in Midnight Cyber Crime Raid