विश्वजीत राणे समर्थकाच्या
अनधिकृत बांधकामाला नोटीस

केरी, दि. २३ : केरी- सत्तरी ग्रामपंचायतीकडून सर्व्हे क्रमांक ७२/२ मधील कथित अनधिकृत बांधकामप्रकरणी गोविंद मोहन गांवस यांना नोटीस बजावली आहे. गोविंद मोहन गांवस हे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे खंदे समर्थक असल्याने पंचायत खरोखरच कारवाई करणार काय, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.


केरी येथील अमित बापूसाहेब राणे व इतरांनी १८ मे २०२६ रोजी यासंबंधीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. पंचायतीने जारी केलेल्या नोटिशीनुसार, संबंधित ठिकाणी तीन स्लॅब / मजल्यांचे बांधकाम करण्यात आले असून ते आवश्यक परवानग्या व परवाने न घेता करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा विषय पंचायत बैठकीत मांडण्यात आला असून, त्यानंतर संबंधितांना नोटीस देण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटिशीत संबंधितांना बांधकाम परवाना, परवानगीपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह आपले स्पष्टीकरण सात दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निर्धारित मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास पंचायत कायद्यानुसार पुढील आवश्यक कारवाई करेल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.

  • Related Posts

    SIO Goa Demands Public Apology, Accountability Over Withdrawn DoE Circular

    The Students Islamic Organisation (SIO) of India, Goa Zone, has demanded accountability from the Directorate of Education (DoE) over a withdrawn circular that allegedly described the organisation as “potentially anti-social and anti-national,” stating that the withdrawal alone cannot undo the damage caused to its reputation.

    Goa Can Become India’s First Zero Road Fatality State: Justice Abhay Sapre

    Goa has the potential to become India’s first state with zero road accident fatalities, former Supreme Court judge Justice Abhay Manohar Sapre said, chairing a high-level review meeting on road safety.

    You Missed

    SIO Goa Demands Public Apology, Accountability Over Withdrawn DoE Circular

    SIO Goa Demands Public Apology, Accountability Over Withdrawn DoE Circular

    Goa Can Become India’s First Zero Road Fatality State: Justice Abhay Sapre

    • By Gaonkaari
    • जुलै 17, 2026
    • 14 views
    Goa Can Become India’s First Zero Road Fatality State: Justice Abhay Sapre

    १५ दिवसांत ३९ (ए) रद्द करा, अन्यथा…

    • By Gaonkaari
    • जुलै 17, 2026
    • 15 views
    १५ दिवसांत ३९ (ए) रद्द करा, अन्यथा…

    रस्ते अपघात राज्य आपत्तीच !

    • By Gaonkaari
    • जुलै 17, 2026
    • 14 views
    रस्ते अपघात राज्य आपत्तीच !

    17/07/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • जुलै 17, 2026
    • 12 views
    17/07/2026 e-paper

    Cruz Silva Urges CM’s Intervention Over Goa University PG Admission Crisis

    • By Gaonkaari
    • जुलै 17, 2026
    • 11 views
    Cruz Silva Urges CM’s Intervention Over Goa University PG Admission Crisis