पर्वरी गोळीबारात ‘सुपारी किलर्स’ ?

हॉटेल फिदाल्गो खरेदी वाद पुन्हा चर्चेत

गांवकारी,दि.२९ (प्रतिनिधी)

गोल्डन पीस हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.चे संचालक आणि कॅसिनो व्यावसायिक श्रीनिवास पी. नायक यांच्यावर पर्वरी येथे झालेल्या गोळीबाराच्या तपासात आता बाहेरगावच्या ‘सुपारी किलर्स’चा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्लेखोर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून, तपासात सापडलेली गोवा नोंदणीची बेवारस कार महत्त्वाचा धागा ठरत असल्याचे समोर आले आहे.

शुक्रवारी रात्री पर्वरीतील मॅजेस्टिक / निओ मॅजेस्टिक परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी नायक यांच्यावर कथितरित्या गोळीबार केला. नायक प्रसंगावधान राखून आत पळाल्याने ते बचावले. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणातील आरोपींना कोणतीही दया दाखवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोळीबारामागील नेमके कारण लवकरच समोर येईल आणि संशयितांना तातडीने अटक करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हॉटेल फिदाल्गो खरेदीचा वाद

दरम्यान, या हल्ल्यानंतर नायक यांच्या जुन्या व्यावसायिक वादांकडेही लक्ष वेधले गेले असून, विशेषतः पणजीतील हॉटेल फिदाल्गो मालमत्ता वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

गोल्डन पीस हॉस्पिटॅलिटीने हॉटेल फिदाल्गोवरील हक्काचा दावा केला होता. या न्यायालयीन प्रकरणात श्रीनिवास नायक कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी होते, तर दुसऱ्या बाजूला माबेरेस्ट हॉटेल्स प्रा. लि. आणि त्याचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जयंत शेट्टी यांचा संबंध होता.

२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने गोल्डन पीस हॉस्पिटॅलिटीचे अपील फेटाळले. हॉटेलचा ताबा, बँकेच्या देणीपोटी सुमारे ४९.४९ कोटींचे कथित पेमेंट आणि २०१९ व २०२० मधील दोन नोंदणी नसलेल्या सामंजस्य करारांच्या आधारे कंपनीने हक्क सांगितला होता. मात्र, या बाबींमुळे मालमत्तेवर कायदेशीर हक्क किंवा मालकी निर्माण होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने ७० कोटींच्या प्रस्तावित व्यवहाराचाही आढावा घेतला होता. काही परिस्थितींवरून गोल्डन पीस हॉस्पिटॅलिटीने हॉटेलचा ताबा चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आणि कथित व्यवहाराला “शाम” अर्थात दिखाऊ/बनावट स्वरूपाचा व्यवहार असे संबोधले. अपील फेटाळताना ५ लाखांचा खर्चही लावण्यात आला.

या पार्श्वभूमीवर नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारामागे व्यावसायिक वैमनस्य, जुना मालमत्ता वाद किंवा अन्य आर्थिक हितसंबंध कारणीभूत आहेत का, याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

मात्र, जयंत शेट्टी, माबेरेस्ट हॉटेल्स किंवा हॉटेल फिदाल्गो वादाचा या गोळीबाराशी संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा सध्या समोर आलेला नाही. पोलिसांकडून व्यवसायिक वैमनस्यासह सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.

  • Related Posts

    Vishnu Wagh’s Brother Slams Governor Arlekar Over Remarks on ‘Sudhir Sukta’, Demands Public Retraction

    Ramrao Wagh calls comments “unwarranted and insulting”, says late poet cannot be maligned years after his death

    Porvorim Shooting: ‘Supari Killers’ Angle Emerges; Hotel Fidalgo Dispute Back in Focus

    Investigation into the firing on casino businessman Shrinivas P. Nayak in Porvorim suggests a contract-killing angle, with the contentious Hotel Fidalgo property dispute re-emerging as a potential motive. Police are probing all angles, though no direct link to the Fidalgo dispute has been established so far.

    You Missed

    29/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 29, 2026
    • 13 views
    29/08/2026 e-paper

    शांत गोव्याला बंदुकीची सलामी ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 29, 2026
    • 17 views
    शांत गोव्याला बंदुकीची सलामी ?

    पर्वरी गोळीबारात ‘सुपारी किलर्स’ ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 29, 2026
    • 14 views
    पर्वरी गोळीबारात ‘सुपारी किलर्स’ ?

    Vishnu Wagh’s Brother Slams Governor Arlekar Over Remarks on ‘Sudhir Sukta’, Demands Public Retraction

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 29, 2026
    • 13 views
    Vishnu Wagh’s Brother Slams Governor Arlekar Over Remarks on ‘Sudhir Sukta’, Demands Public Retraction

    Porvorim Shooting: ‘Supari Killers’ Angle Emerges; Hotel Fidalgo Dispute Back in Focus

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 29, 2026
    • 14 views
    Porvorim Shooting: ‘Supari Killers’ Angle Emerges; Hotel Fidalgo Dispute Back in Focus

    Majestic Casino Firing: Two Assailants Fire Three Rounds at Director Srinivas Nayak, Bodyguard Fires Back

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 28, 2026
    • 15 views
    Majestic Casino Firing: Two Assailants Fire Three Rounds at Director Srinivas Nayak, Bodyguard Fires Back