गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

साखळी, दि. २ (प्रतिनिधी) : देशात ‘अब की बार चारसौ पार’चा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत २४० जागांवर थांबावे लागले आणि केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांचा आधार घ्यावा लागला. त्यानंतरही विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण सुरूच राहिले. गोव्यातही ‘डबल इंजिन सरकार’च्या विकासाचे दावे प्रत्यक्षात उतरलेले दिसत नाहीत. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच जनतेसमोरील पर्याय आहे, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केला.

गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसच्या ‘गोंय राखण यात्रे’ने गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात प्रवेश केला. पायलट यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या यात्रेत काँग्रेसने जमीन, पर्यावरण, रोजगार, सांस्कृतिक वारसा, मतदारांचे हक्क आणि प्रशासन या मुद्द्यांवरून राज्यातील भाजप सरकारला लक्ष्य केले.

लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत पायलट म्हणाले की, भाजपने ‘चारसौ पार’चा दावा केला होता; मात्र मतदारांनी त्यांना २४० जागांवर रोखले. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली. तृणमूल काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या पक्षांमध्ये झालेल्या फुटींचा उल्लेख करत त्यांनी भाजपवर ‘फोडा आणि राज्य करा’चे राजकारण केल्याचा आरोप केला.

“डबल इंजिन सरकारचा मोठा गाजावाजा केला जातो; पण विकासाच्या बाबतीत हे इंजिन केवळ धूर सोडताना दिसत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

‘नोटबंदीनंतर आता मतबंदी’

मतदार याद्यांमधील नावांशी संबंधित वादाचा उल्लेख करत पायलट यांनी भाजपवर आणखी एक आरोप केला. “भाजपने आधी नोटबंदी केली, आता मतबंदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते म्हणाले. ज्या भागांत भाजपला निवडणुकीत अडचण होण्याची शक्यता आहे, तेथे मतदारांशी संबंधित प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारांच्या घटनात्मक हक्कांसाठी काँग्रेस संघर्ष करत राहील, असेही त्यांनी सांगितले.

‘गोंय राखण यात्रा’ ही केवळ राजकीय यात्रा नसून गोव्याची जमीन, पर्यावरण, रोजगार, सांस्कृतिक ओळख आणि वारसा जपण्यासाठी जनतेचे प्रश्न मांडणारे आंदोलन असल्याचे पायलट यांनी नमूद केले.

‘सत्ता परिवर्तनाची सुरुवात साखळीतून करा’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख करत पायलट यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यात्रेला परवानगी मिळवताना अडथळे आणण्यात आले, पोस्टर्स फाडण्यात आले तसेच लोकांना सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.

“अशा दबावामुळे काँग्रेस कार्यकर्ते घाबरणार नाहीत. उलट जनतेच्या प्रश्नांसाठी आणखी ताकदीने लढण्याची प्रेरणा मिळेल,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत यांच्या निवडणुकीतील मताधिक्याचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांना, “गोव्यातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात साखळीतून करा,” असे आवाहन केले.

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही जमीन, अस्मिता, पर्यावरण, रोजगार आणि सांस्कृतिक वारसा या मुद्द्यांवर सरकारवर टीका केली. गोव्याच्या संसाधनांच्या संरक्षणासाठी जनतेचा आवाज संघटित करणे हा ‘गोंय राखण यात्रे’चा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, वरुण धवन, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार अल्टन डिकॉस्टा, आमदार कार्लोस अल्वारेस फरेरा, एम. के. शेख, सुनील कवठणकर, अमरनाथ पणजीकर, हिमांशू तिवरेकर, महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिक्षा खलप, युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, सेवादल मुख्य संघटक राजन घाटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक नेत्यांमध्ये मंगलदास नाईक, सूर्यकांत गावडे, धर्मेश सगलानी, प्रविण ब्लागन, प्रताप गावस, सुनीता वेरेकर, खेमलो सावंत, जयेश आमोणकर, गौरी गावस, ज्योत्स्ना गावस, रशीद खान चौधरी आणि रियाज गनी यांचा समावेश होता.

अमरनाथ पणजीकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. गटाध्यक्ष सूर्यकांत गावडे यांनी स्वागत केले, तर मंगलदास नाईक यांनी आभार मानले. पारंपरिक चपय लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने यात्रेच्या साखळीतील कार्यक्रमाची सांगता झाली.

  • Related Posts

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    The Bandora Environment Protection Forum (BEPF) has sought urgent action over the alleged illegal felling of coastal mangrove trees in Survey No. 112/1 at Undir-Bandora in Ponda taluka, demanding registration of an FIR and restoration of the affected mangrove area.

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    A Goa Police employee is seeking a criminal investigation into his wife’s suicide, alleging sustained harassment by a third person pushed her into severe mental distress. Despite a detailed complaint submitted, no FIR has been registered yet.

    You Missed

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 12 views
    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 19 views
    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 15 views
    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    02/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 18 views
    02/10/2026 e-paper

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 23 views
    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 25 views
    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर