सीजेपी आंदोलनात सहभागी व्हा

‘इनफ इज इनफ’चा पाठिंबा

गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ११ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर आयोजित आंदोलनाला ‘इनफ इज इनफ, गोवा’ चळवळीने जाहीर पाठिंबा दिला आहे. देशातील संविधानात्मक संस्थांच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचे प्रकार सुरू असताना जागरूक नागरिक म्हणून गप्प बसणे शक्य नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी संघटित होऊन आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन चळवळीचे निमंत्रक तथा निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी केले.

लोकशाही मूल्यांचे आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या संस्थांवर आहे, त्यांच्याच कार्यपद्धतीमुळे लोकशाहीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास टिकून राहणे आवश्यक असून, त्यासाठी त्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असलेच पाहिजे, असे न्या. रिबेलो म्हणाले.

तांत्रिक अथवा अन्य कारणांचा आधार घेत लाखो मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत आधार असून, पात्र नागरिकांना या अधिकारापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालण्यासारखे आहे. मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणाच्या नावाखाली नागरिकांचे मतदानाचे अधिकार हिरावले जाता कामा नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाही आणि संविधानात्मक मूल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ राजकीय पक्षांची नसून प्रत्येक जागरूक नागरिकाची आहे. त्यामुळे गोव्यातील सामाजिक संघटना, कार्यकर्ते, लोकशाहीप्रेमी नागरिक आणि विविध क्षेत्रांतील सजग व्यक्तींनी ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन न्या. फेर्दिन रिबेलो यांनी केले.

  • Related Posts

    गोव्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या : डी. के. शिवकुमार

    कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गोमंतकीय जनतेला गोव्याची जमीन, पर्यावरण, रोजगार आणि लोकशाही अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. ‘गोंय राखोंण यात्रे’त त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत गोव्यातील सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराच्या चिंतेवर प्रकाश टाकला.

    Supreme Court Sets Aside Bombay HC Order in Goa Weightlifting Coach Selection Dispute

    Apex Court orders fresh hearing after finding that female weightlifter Vaishnavi Ugadekar was not heard despite being one of only two candidates for the post

    You Missed

    गोव्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या : डी. के. शिवकुमार

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 8, 2026
    • 12 views
    गोव्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या : डी. के. शिवकुमार

    Supreme Court Sets Aside Bombay HC Order in Goa Weightlifting Coach Selection Dispute

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 8, 2026
    • 13 views
    Supreme Court Sets Aside Bombay HC Order in Goa Weightlifting Coach Selection Dispute

    भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची ‘आप’ची रणनीती!

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 8, 2026
    • 29 views
    भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची ‘आप’ची रणनीती!

    08/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 8, 2026
    • 27 views
    08/10/2026 e-paper

    08/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 8, 2026
    • 31 views
    08/10/2026 e-paper

    नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड!

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 8, 2026
    • 22 views
    नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड!