उगवेतील बेकायदा रेती उपसा रोखा

सरपंच सुबोध महाले यांचे पोलिसांना पत्र
—————————-
गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) : पेडणे तालुक्यातील उगवे गावात तेरेखोल नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित बेकायदा रेती उपशाविरोधात तांबोसे-मोपा-उगवे ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकाराला तातडीने आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच सुबोध महाले यांनी पेडणे पोलिसांकडे केली आहे.

सरपंच महाले यांनी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी पेडणे पोलिस निरीक्षक तथा उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांना लेखी पत्र पाठवून उगवे परिसरातील तेरेखोल नदीपात्रातून बेकायदेशीरपणे रेती उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. ग्रामपंचायतीचा या बेकायदा प्रकाराला तीव्र विरोध असून संबंधित अधिकाऱ्यांकडे यापूर्वीही अनेकदा निवेदने सादर करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

उगवे गावातील नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी नदीकिनारी नियमितपणे दिवसरात्र पोलिस गस्त घालण्यात यावी, अशी मागणी सरपंचांनी केली आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी होणाऱ्या कथित अवैध रेती उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी नदीकिनारी किनारी पोलिस दलाचे कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक तैनात करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

बेकायदा रेती उपशाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे सरपंच महाले यांनी पत्रात म्हटले आहे.

  • Related Posts

    लैंगिक अत्याचार प्रकरणांनी गोवा हादरला

    काणकोणात नवे प्रकरण उघडकीस म्हापसा प्रकरणी संशयित जेरबंद ———————— गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) : राज्यातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. म्हापसा येथे दिवाळीच्या दिवशी चार वर्षीय बालिकेवर…

    प्रकाशपर्वातून नव्या गोव्याचा संकल्प !

    या दिवाळीत केवळ घरे उजळवू नका, मनेही उजळवा. निसर्गाला जपा, माणुसकीला कवटाळा आणि संविधानाच्या मूल्यांना बळ द्या. कारण गोव्याचे खरे वैभव त्याच्या इमारतींत किंवा संपत्तीत नाही, तर इथल्या निसर्गात, संस्कृतीत…

    You Missed

    Arti Patkar Demands Swift Justice in Curchorem Sexual Assault Case

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 12, 2026
    • 7 views
    Arti Patkar Demands Swift Justice in Curchorem Sexual Assault Case

    उगवेतील बेकायदा रेती उपसा रोखा

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 12, 2026
    • 10 views
    उगवेतील बेकायदा रेती उपसा रोखा

    लैंगिक अत्याचार प्रकरणांनी गोवा हादरला

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 12, 2026
    • 11 views
    लैंगिक अत्याचार प्रकरणांनी गोवा हादरला

    केळशी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा दणका

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 12, 2026
    • 8 views
    केळशी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा दणका

    भाजपचे राजकीय ‘फ्ली मार्केट’!

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 12, 2026
    • 9 views
    भाजपचे राजकीय ‘फ्ली मार्केट’!

    Smart Meter Naka Demands Scrapping of Goa’s Smart Meter Project, Seeks Meeting with CM

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 11, 2026
    • 15 views
    Smart Meter Naka Demands Scrapping of Goa’s Smart Meter Project, Seeks Meeting with CM