अडवई गावाचा ऐतिहासिक निर्णय; बाहेरच्यांना जमीन विक्रीवर एकमताने बंदी

सत्तरी, दि. २ ऑगस्ट : गोव्यातील वाढत्या जमीन खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर सत्तरी तालुक्यातील अडवई गावाने आपल्या अस्तित्व, संस्कृती आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. श्री शांतादुर्गा देवी मंदिरात गावातील पाचही पिळग्यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन गावातील कोणतीही जमीन, घर किंवा प्लॉट बाहेरच्या व्यक्तींना विकला जाणार नाही, असा एकमताने ठराव मंजूर केला.

गावकऱ्यांच्या मते, बाहेरच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी होत असल्याने गावाची ओळख, सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. भविष्यात गावातील जमीन गावकऱ्यांच्याच मालकीत राहावी आणि स्थानिकांचा जमिनीवरील हक्क अबाधित राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.

मात्र, या निर्णयाला एक महत्त्वाचा अपवाद ठेवण्यात आला आहे. गावातीलच एखाद्या कुटुंबातील सदस्याला किंवा बहिणी-भावाच्या मुलांना घर बांधण्यासाठी जमीन आवश्यक असल्यास, गावातील व्यक्तींमध्ये परस्पर व्यवहार करण्यास परवानगी असेल.

श्री शांतादुर्गा देवी मंदिरात झालेल्या बैठकीत पाचही पिळग्यांच्या उपस्थितीत हा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गावाच्या भवितव्यासाठी आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने हा ठराव स्वीकारल्याचे सांगण्यात आले.

गोव्यात वाढत्या जमीन व्यवहारांबाबत सातत्याने चिंता व्यक्त होत असताना अडवई गावाने घेतलेला हा निर्णय इतर गावांसाठीही एक नवा आदर्श ठरू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • Related Posts

    २०१० बॅच आयआरबी उपनिरीक्षकांची मागील १७ वर्षांची पदोन्नती ठप्प

    अन्यायाच्या भावनेतून प्रचंड अस्वस्थता गांवकारी,दि. २९ (प्रतिनिधी) गोवा पोलिस खात्यातील पदोन्नती, ज्येष्ठता आणि करिअर प्रगतीवरून दीर्घकाळ चालत आलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंडियन रिझर्व्ह बटालियन (भारतीय सशस्त्र दल)…

    फोंड्याहून निसटलेल्या सापाचे आत्मवृत्त

    फोंड्याची सीमा ओलांडून मी खांडेपारच्या दिशेने कूच केली. इथून सरपटत सरळ गेलो कि तिथल्या जंगलातून बोंडला मार्गे म्हादई आणि मग दिशा मिळेल तिथे सुटायचं असा बेत होता. निवडणूका जवळ आल्या…

    You Missed

    अडवई गावाचा ऐतिहासिक निर्णय; बाहेरच्यांना जमीन विक्रीवर एकमताने बंदी

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 2, 2026
    • 20 views
    अडवई गावाचा ऐतिहासिक निर्णय; बाहेरच्यांना जमीन विक्रीवर एकमताने बंदी

    Private Bus Operators Seek CM’s Directive to Halt Further KTCL EV Bus Induction

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 2, 2026
    • 17 views
    Private Bus Operators Seek CM’s Directive to Halt Further KTCL EV Bus Induction

    01/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 1, 2026
    • 19 views
    01/08/2026 e-paper

    गोव्यातील विद्यार्थी आंदोलनाला बळी पडले नाहीत : मुख्यमंत्री सावंत

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 1, 2026
    • 22 views
    गोव्यातील विद्यार्थी आंदोलनाला बळी पडले नाहीत : मुख्यमंत्री सावंत

    जेन झीला ‘असभ्य’ ठरविण्याचा प्रयत्न?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 1, 2026
    • 24 views
    जेन झीला ‘असभ्य’ ठरविण्याचा प्रयत्न?

    गिरीश- विजय यांची युतीसाठी बैठक

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 1, 2026
    • 16 views
    गिरीश- विजय यांची युतीसाठी बैठक