बेरोजगार परिचारिकांची भरली जत्रा

आरोग्य खात्याच्या बेपर्वाईचा अनेकांना फटका

गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी)
राज्य आरोग्य संचालनालयाने शंभर कंत्राटी परिचारिकांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादामुळे आरोग्य खाते कोलमडल्याचा प्रकार आज घडला. थेट मुलाखतींसाठी आजचा दिवस निश्चित करण्यात आला होता. मात्र तब्बल साडेतीन ते चार हजार उमेदवारांनी हजेरी लावल्यामुळे आरोग्य खात्यासमोर परिचारिकांची जणू जत्राच भरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आरोग्य खात्याने काही दिवसांपूर्वी ही जाहिरात प्रसिद्ध केली होती. इतर ७० पदांसह शंभर कंत्राटी परिचारिकांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. आज सकाळपासूनच कांपाल, पणजी येथील आरोग्य खात्यासमोर परिचारिकांच्या रांगा लागल्या. या रांगा इतक्या लांब गेल्या की राज्यातील बेरोजगारीचे जणू प्रदर्शनच घडले.
या प्रकरणाची दखल घेऊन आम आदमी पार्टीचे राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर आणि श्रीकृष्ण परब हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उमेदवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या पालकांसाठी पाण्याची सोय केली. यावेळी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने आरोग्य संचालकांची भेट घेतली असता, “जाहिरातीला असा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती,” असे म्हणून त्यांनी विषय आटोपता घेतला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता संचालक निघून गेल्या.
घोर निराशेमुळे उमेदवार परतले
परिचारिका पदांसाठी बहुतांश उमेदवार युवती होत्या. दुपारी २ वाजेपर्यंत फक्त ४०० ते ५०० जणांच्या मुलाखती झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित हजारो उमेदवारांच्या मुलाखती घेणे अशक्य असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करून परतण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवसात मुलाखती घेण्याचा प्रकार म्हणजे आरोग्य खाते परिचारिका पदांसाठी किती उमेदवार रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत याबाबत अनभिज्ञ असल्याचेच स्पष्ट होते.
रोजगार विनिमय केंद्राकडे परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांची माहिती किंवा संख्या मागितली असती, तर किमान किती उमेदवार येऊ शकतात याचा अंदाज आला असता. परंतु आरोग्य खात्याला याचे काहीच भान नसल्याचे दिसते.
ही निव्वळ थट्टा
आरोग्य खात्यात परिचारिकांची पदे रिकामी आहेत. ही पदे नियमित भरली जाण्याची गरज असताना कंत्राटी पद्धतीने का भरली जात आहेत? ही भरती राज्य कर्मचारी भरती आयोगामार्फत का केली जात नाही? आरोग्य खात्याला या भरतीतून सूट देण्यात आली आहे का? असे संतप्त सवाल अनेक उमेदवारांनी उपस्थित केले.

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 10 views
    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 23 views
    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 16 views
    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 20 views
    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 18 views
    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 18 views
    गडकरींना काळे झेंडे दाखवणार