चोर तुपाशी आणि शिक्षक उपाशी!

गोवा समग्र शिक्षकांची पगारासाठी उपेक्षा

गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)

गोवा समग्र शिक्षा अभियानाच्या बँक खात्यातून ५ कोटी रूपयांची अफरातफर करणारे चोर तुपाशी खात असले तरी सहा महिने ते वर्षभराचा पगारच न झाल्यामुळे अंतर्गत राज्यातील विविध शाळांमध्ये सुमारे शंभराहून अधिक कला शिक्षकांची उपासमार सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत आणि त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्यांचा यात समावेश आहे.

गोवा शिक्षण खात्याच्या वतीने गोवा समग्र शिक्षा अभियान हा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. कला, कौशल्य आदी शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा, या हेतूने वेगवेगळे उपक्रम या अभियानामार्फत राबवले जात आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला असून, त्याची कार्यवाही गोवा समग्र शिक्षण अभियानामार्फत केली जात आहे. विविध सरकारी व अनुदानित शाळांमध्ये चित्रकला, संगीत, नृत्य आणि नाट्यकला हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी गोवा समग्र शिक्षा अभियानातर्फे सुमारे दीडशेहून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला असला तरी त्यांच्या पगाराची सोयच करण्यात आली नसल्याने हे शिक्षक गेले वर्षभर बिनपगारी सेवा बजावत आहेत.
नियुक्ती प्रस्ताव पाठवून वर्ष उलटले, तरी नियुक्ती नाही!
शिक्षण खात्याच्या कारभाराचे वाभाडेच गोवा समग्र शिक्षा अभियानाच्या कारभारावरून स्पष्ट झाले आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये गोवा समग्र शिक्षा अभियानांतर्गत कला शिक्षकांच्या नियुक्तीसाठी विविध उमेदवारांना नियुक्ती प्रस्ताव पाठविण्यात आले. ह्यापैकी सुमारे शंभर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी अनेकांना नियुक्ती प्रस्ताव पाठवूनही नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत.
नियुक्त झालेल्या उमेदवारांचा गेले वर्षभर पगाराच्या नावाने टोलवाटोलवी सुरू आहे. वर्ष उलटले तरी पगारच मिळालेला नसल्याने हे शिक्षक अत्यंत नाराज आहेत. “ही थट्टा नेमकी काय चालली आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कंत्राट नुतनीकरणात डावलण्याच्या भीतीने हा अन्याय मुकाट्याने सहन केला जात आहे. महिना २० हजार रुपये पगारावर या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, सरकारच्या वित्त खात्याकडे संपर्क साधला असता या शिक्षकांच्या नियुक्तीबाबत वित्त खात्याकडून पगाराच्या तरतुदीच करण्यात आलेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे खाती, मग हा गोंधळ का?

शिक्षण आणि वित्त ही दोन्ही खाती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अखत्यारीत आहेत. मग त्यांच्या खात्यांकडून कला शिक्षकांची ही उघड थट्टा का सुरू आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
गोवा समग्र शिक्षा अभियानांतर्गत नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या पगाराची सोय का करण्यात आली नाही? ही केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त योजना असून, ६० टक्के निधी केंद्र सरकार आणि ४० टक्के निधी राज्य सरकार पुरवते. मात्र, मुख्यमंत्र्यांकडील दोन्ही खात्यांच्या हलगर्जीपणामुळे या उमेदवारांची फरफट सुरू असल्याने हा विषय चर्चेत आहे.

पॅरा शिक्षकांना गेले तीन महिने पगारच मिळालेला नाही. इतकी वर्षे सेवेत असूनही पगारासाठी खात्याकडून सतावणूक सुरू आहे. सरकारी सेवेत नियमित करण्याच्या वल्गनाही पोकळ ठरल्याने हे शिक्षक नाराज आहेत.

  • Related Posts

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    चर्चा स्थगित ठेवण्याचा गोवा फॉरवर्डचा निर्णय गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युतीची प्राथमिक चर्चा सुरू होऊन काही दिवसही उलटले नाहीत, तोच गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने युतीची…

    ‘गोंय राखण यात्रे’ साठी काँग्रेस सज्ज

    प्रदेश समिती आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक गांवकारी,दि.४ (प्रतिनिधी) विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घोषित केलेल्या गोंय राखण यात्रेसाठी गोवा प्रदेश काँग्रेस सज्ज बनली आहे. काँग्रेस समिती आणि राज्य कार्यकारिणीच्या…

    You Missed

    05/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 7 views
    05/08/2026 e-paper

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 16 views
    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 27 views
    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 18 views
    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 18 views
    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    Chodankar Refuses to Retract Statements on Karapur Project, Says Legal Notices Will Not Silence Public Questions

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 20 views
    Chodankar Refuses to Retract Statements on Karapur Project, Says Legal Notices Will Not Silence Public Questions