काँग्रेसची यात्रा आज साखळीत फिरणार

साखळीकर सहभागी होणार नाहीत: मुख्यमंत्री


गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी)

काँग्रेस पक्षाच्या गोंय राखण यात्रेचे ढोल, ताशे आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात वाजणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या यात्रेत साखळीकर सहभागी होणार नाहीत,असा टोला हाणला असून साखळीतील यात्रा यशस्वी करण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे ठाकले आहे.
काँग्रेसच्या साखळी मतदारसंघातील यात्रेत सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट हजर राहणार आहेत. काँग्रेसने आपल्या संपूर्ण यात्रेत आणि प्रचारात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना लक्ष्य केल्यामुळे साखळीतील या यात्रेकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. साखळी मतदारसंघातील काँग्रेसच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे पोस्टर आणि प्रचार साहित्य फाडण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपने पोस्टर-बॅनरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी रोजगार, जमीन संरक्षण, विकास, अमली पदार्थ, महागाई तसेच गोव्याची अस्मिता आणि साधनसंपत्तीच्या प्रश्नांवर चर्चा करावी, असे आव्हान काँग्रेस नेत्यांनी केले आहे.

  • Related Posts

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    A Goa Police employee is seeking a criminal investigation into his wife’s suicide, alleging sustained harassment by a third person pushed her into severe mental distress. Despite a detailed complaint submitted, no FIR has been registered yet.

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    Residents of Milroc Kadamba at Bainguinim, Old Goa, have raised serious concerns over a suspected unauthorised hazardous casting yard operating in a residential area, alleging excessive noise, dust, fumes, and safety risks. They demand immediate inspection and a stop-work order if necessary permissions are not produced.

    You Missed

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 12 views
    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    02/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 16 views
    02/10/2026 e-paper

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 19 views
    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 19 views
    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    कंत्राटी कर्मचारी नियमितीकरण अधिसूचनेत स्पष्टता नाही

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 18 views
    कंत्राटी कर्मचारी नियमितीकरण अधिसूचनेत स्पष्टता नाही

    काँग्रेसची यात्रा आज साखळीत फिरणार

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 8 views
    काँग्रेसची यात्रा आज साखळीत फिरणार