दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

मडगाव – “श्री गणेश पॅंडल स्कॅंडल प्रकरणापासून ते आकें रिंग रोडवरील श्री गणेश मंदिराबाहेर समाजकंटकांचा अड्डा तयार करण्यापर्यंत, पक्षबदलू आमदार व सार्वजनीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मडगाव नगरपालिका सार्वजनिक श्री गणेशोत्सवाच्या पूजास्थळाचा पाडाव करून तिथे दोन मजली इमारत उभारण्याचा त्यांचा प्रयत्न हा श्रद्धा व परंपरेवर थेट आघात आहे,” असा गंभीर आरोप मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी केला आहे.

गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मडगाव नगरपालिका उद्यानात असलेल्या विद्यमान रचनेच्या पाडावासाठी आणि दोन मजली इमारतीच्या बांधकामासाठी ३.९६ कोटी रुपयांची निवीदा काढल्याबाबत प्रतिक्रिया देताना, प्रभव नायक यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला. स्थानिक नागरिक आणि भाविकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प पुढे रेटण्यामागील हेतू काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रभव नायक यांनी पुढे सांगितले की, मडगाव नगरपालिका उद्यानाकडे मडगांवकरांचे  ऐतिहासिक व भावनिक नाते आहे. अनेक पिढ्यांपासून ही जागा बालपणीच्या आठवणी आणि सामाजिक एकोप्याचे केंद्र राहिली आहे, त्यामुळे ते शहराचे एक वारसास्थळ बनले आहे.

त्यांनी दिगंबर कामत यांच्यावर सातत्याने जनभावनांकडे दुर्लक्ष करून अनावश्यक बांधकामांना प्राधान्य देण्याचा आरोप केला. प्रस्तावित दोन मजली इमारत पुढे  बार, रेस्टॉरंट किंवा डान्स बार स्थापन करण्यासाठी दिली जाऊ शकते, अशीही भीती प्रभव नायक यांनी व्यक्त केली.

आपला ठाम विरोध नोंदवत, प्रभव नायक यांनी स्पष्ट केले की, मडगांवचो आवाज या सुंदर आणि ऐतिहासिक उद्यानाचे “काँक्रीटच्या कुरूप रचनेत” रूपांतर होऊ देणार नाही. त्यांनी नागरिकांना एकत्र येऊन मडगावच्या वारसा व श्रद्धा स्थळाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले.

  • Related Posts

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    Panaji: A site inspection conducted by the Goa Coastal Zone Management Authority (GCZMA) in connection with Delta Pleasure Cruise Company Pvt. Ltd.’s proposal to operate a new vessel, M.V. Deltin…

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    Panaji: In view of the prevailing geopolitical situation and constraints affecting LPG supply, the Government of Goa has issued a public notice urging residents, particularly in Tiswadi and Ponda, to…

    You Missed

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 17 views
    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 14 views
    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 20 views
    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    Objection Filed Against Tillari Command Area Denotification in Dhargalim

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 21 views
    Objection Filed Against Tillari Command Area Denotification in Dhargalim

    FIR Registered in Ponda Land Grabbing CaseAllegations of Forged TCP NOCs and Illegal Sale Deeds

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 10 views
    FIR Registered in Ponda Land Grabbing CaseAllegations of Forged TCP NOCs and Illegal Sale Deeds

    25/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 27 views
    25/03/2026 e-paper