फिल्टर कॉफी स्टार्टअपला राष्ट्रीय स्तरावर पसंती

रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीकडे करार

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)

गोव्याच्या केपे – असोल्ड्याची युवती कु. तन्वी राऊत देसाई हिने २०२० साली स्थापन केलेल्या फिल्टर कॉफी या स्टार्टअपची पेटीएमचे माजी सीईओ प्रविण जाधव यांच्या रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने व्यावसायिक भागीदारीसाठी निवड केली आहे. यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर कंपनीकडून यासंबंधीची अधिकृत घोषणा झाली आहे.
फिल्टर कॉफी हे स्टार्टअप तन्वी राऊत देसाई हिने आपल्या मित्रांसोबत मिळून २०२० मध्ये स्थापन केले होते. या स्टार्टअपच्या सहाय्याने व्यावसायिक माहिती सुलभ आणि सहजतेने प्राप्त होऊ शकते. फायनान्शियल बाजारात डेटा-आधारित माहिती व्हिडिओ आणि स्टोरीटेलिंगच्या माध्यमातून पोहचवण्यात या स्टार्टअपची मदत घेऊन रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार अधिक प्रभावी पद्धतीने करू शकणार आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकृष्ट करण्यात मदत होते आणि त्यातून व्यावसायिक विस्तारीकरण आणि टार्गेट निर्धारित काम करणे सोपे बनते.
या भागीदारीबद्दल बोलताना रेझचे संस्थापक आणि सीईओ प्रवीण जाधव म्हणाले की फिल्टर कॉफी हा एक विश्वासार्ह ब्रँड आहे. हा ब्रँड भारताच्या उदयोन्मुख गुंतवणूकदार वर्गाशी संवाद साधण्यात मदतगार ठरणार आहे. या स्टार्टअपच्या वाढीस समर्थन देण्यासाठी रेझ उत्सुक आहे, असेही ते म्हणाले. पेटीएमचे माजी सीईओ असलेले प्रवीण जाधव यांनी तिथून राजीनामा दिल्यानंतर रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी स्थापन केली. या कंपनीने स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रात अनेक वित्तीय सेवा प्रदान केल्या आहेत.
भाऊ-बहिणीचा डंका
केपे-असोल्डा येथील रहिवासी तथा निवृत्त सरकारी वकिल सत्यवान राऊत देसाई यांची कु. तन्वी ही मुलगी आहे. त्यांचा मुलगा तेजस राऊत देसाई याची अलिकडेच अमेरिकेतील सीएनबीसी टेलेव्हीजनवर संरक्षण गुंतवणुकीवरील मुलाखत प्रसारित झाली होती. ग्लोबल एक्स इटीएफ्स मधील थीमॅटिक रिसर्च टीमवर विश्लेषक म्हणून तो काम पाहत आहे. या दोन्ही भाऊ-बहिणीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक सुरू आहे.

माझ्या बेडरूममध्ये सुरू केलेला एक छोटा प्रकल्प भारतातील एका आघाडीच्या कंपनीचा भाग बनत असल्याचा आनंद आहे. दोन महिन्यांपूर्वी मी मुंबई गाठली. एकतर या स्टार्टअपला पुढे न्यायचे किंवा तो प्रकल्प सोडून द्यायचा. कुटुंबियांकडून पैसे जमा केले आणि हे ध्येय साध्य करायचे ठरवले. काही प्रमाणात भीतीने स्टार्टअपची माहिती देणारा एक ईमेल प्रकाशित केला. आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे सीईओ, संस्थापक, कार्यकारी अधिकारी अशा ८ हजार जणांनी तो पाहिला आणि तिथून पुन्हा उमेदीला नवे पंख फुटले. रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने या प्रकल्पाला पसंती दिली आणि पूर्ण सहकार्याची हमी देत हा करार केला.’
कु. तन्वी सत्यवान राऊत देसाई
संस्थापक- फिल्टर कॉफी

  • Related Posts

    श्री देव खाप्रेश्वर; भाजपच्या रसातळाची नांदी

    शासन आज चुकीच्या मार्गाने जात आहे हे नजरेसमोर ठळक दिसत असतानाही विश्वजित राणे, सुदीन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, रवी नाईक तथा देव देवतांवर सदैव श्रद्धा असणारे दिगंबर कामत यांच्यासारखे दिग्गज नेते…

    होळी – साधनेची रात्र

    संपूर्ण निर्मिती हा ऊर्जेचा साक्षात्कार आहे. सृजनातील प्रत्येक वस्तू, सर्व लोक (अस्तित्वाची परिमाणे) आणि युगे (काळाची परिमाणे) ऊर्जा रूपात अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे जीवसृष्टी केवळ पृथ्वीवरच अस्तित्वात आहे आणि स्वर्गीय…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    सरकारच्या प्रामाणिकतेवर सीएची मोहोर

    • By Gaonkaari
    • मार्च 13, 2025
    • 5 views
    सरकारच्या प्रामाणिकतेवर सीएची मोहोर

    12/03/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 12, 2025
    • 7 views
    12/03/2025 e-paper

    भाऊसाहेबांचे स्मरण करताना…

    • By Gaonkaari
    • मार्च 12, 2025
    • 7 views
    भाऊसाहेबांचे स्मरण करताना…

    श्री देव खाप्रेश्वर; भाजपच्या रसातळाची नांदी

    • By Gaonkaari
    • मार्च 12, 2025
    • 11 views
    श्री देव खाप्रेश्वर; भाजपच्या रसातळाची नांदी
    error: Content is protected !!