वाडे-कुर्डी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जीएसएससी परीक्षांसाठी मोफत कोचिंग

गांवकारी, दि. १६ प्रतिनिधी:
स्थानिक युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पी. एम. श्री सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, वाडे-कुर्डी यांनी कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी शाळेतर्फे मोफत कोचिंग क्लासेस सुरू करण्यात आले आहेत.

४ मे २०२६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमात प्रामुख्याने संगणक आधारित परीक्षेवर म्हणजेच सीबीटीवर विशेष भर देण्यात येत आहे. स्थानिक युवकांना सरकारी नोकरीच्या संधींसाठी सक्षम करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि स्पर्धा परीक्षांची भीती दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

हा उपक्रम मुख्याध्यापक विपुल उ. सावंत यांच्या कल्पक नेतृत्वाखाली आणि शाळेतील शिक्षकांच्या परिश्रमातून साकार झाला आहे. या कोचिंग क्लासेसला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विषयांची सोपी मांडणी, नियोजनबद्ध अध्यापन आणि योग्य मार्गदर्शनामुळे कठीण विषयही सहज समजत असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.

या मोफत कोचिंगमध्ये अंकगणित, तार्किक विचार, इंग्रजी व्याकरण व आकलन, तसेच कोंकणी भाषा या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. उमेदवारांची सर्वांगीण तयारी व्हावी, यासाठी विषयानुसार मार्गदर्शन केले जात आहे.

विशेष म्हणजे, सीबीटी-१ मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शाळेतर्फे शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठीही मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे लेखी परीक्षेबरोबरच पुढील टप्प्यांसाठीही उमेदवारांना तयारीची संधी उपलब्ध होणार आहे.

स्थानिक युवकांसाठी ही एक महत्त्वाची आणि दुर्मिळ संधी असून, अधिकाधिक इच्छुक उमेदवारांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

  • Related Posts

    वाढत्या गुन्हेगारीवरून सरकार गारद

    सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; दोषसिद्धीचे प्रमाण घटलेगांवकारी,दि.१ (प्रतिनिधी) राज्याची ओळख दिवसेंदिवस ‘गुन्हेगारीची राजधानी’ अशी होत चालली आहे. वाढते गुन्हे आणि कमी होत असलेले दोषसिद्धीचे प्रमाण ही राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या अपयशाचे भयावह चित्र…

    Viresh Borkar Flags Delay in Breach of Privilege Matter, Seeks Early Hearing in Goa Assembly

    Revolutionary Goans Party (RGP) MLA Viresh Borkar raised concerns in the Goa Legislative Assembly about the delay in a pending breach of privilege matter, advocating for an early hearing and transparent resolution.

    You Missed

    01/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 1, 2026
    • 21 views
    01/09/2026 e-paper

    वाढत्या गुन्हेगारीवरून सरकार गारद

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 1, 2026
    • 17 views
    वाढत्या गुन्हेगारीवरून सरकार गारद

    परप्रांतीयांच्या गुन्हेगारीवर खापर ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 1, 2026
    • 12 views
    परप्रांतीयांच्या गुन्हेगारीवर खापर ?

    Viresh Borkar Flags Delay in Breach of Privilege Matter, Seeks Early Hearing in Goa Assembly

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 31, 2026
    • 18 views
    Viresh Borkar Flags Delay in Breach of Privilege Matter, Seeks Early Hearing in Goa Assembly

    Borkar Raises Unemployment and Job Security Concerns in Goa Assembly

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 31, 2026
    • 21 views
    Borkar Raises Unemployment and Job Security Concerns in Goa Assembly

    Goa Transport Dept Orders Crackdown on Buses Carrying Standing Passengers Without Approval

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 31, 2026
    • 22 views
    Goa Transport Dept Orders Crackdown on Buses Carrying Standing Passengers Without Approval