कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा

गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी)

सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी अथवा अन्य स्वरूपात १० वर्षापासून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केली. गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत यापूर्वी सुमारे तीन हजार नोकऱ्या देण्यात आल्या असून, पारदर्शक पद्धतीने आणखी दोन हजार नोकऱ्या देण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी रोजगार, अनुसूचित जमातींचे हक्क, गृहनिर्माण, आरोग्य तसेच कला-संस्कृती क्षेत्राशी संबंधित विविध योजनांचा उल्लेख केला.

सहा महिन्यांत ६ ते ८ हजार नोकऱ्या

राज्यातील रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांत सुमारे ६ ते ८ हजार नोकऱ्या निर्माण करण्यात येतील, असे जाहीर केले. सरकारी नोकऱ्यांच्या भरतीत पारदर्शकता राखण्यावर सरकारचा भर असल्याचे सांगत त्यांनी गोवा कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून आतापर्यंत तीन हजार नोकऱ्या देण्यात आल्याचा दावा केला. याच पद्धतीने आणखी दोन हजार नोकऱ्या देण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहा वर्षे कंत्राटी सेवेत असलेल्यांना दिलासा

सरकारी खात्यांमध्ये दहा वर्षे कंत्राटी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दीर्घकाळापासून सेवेत कायम होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

एसटी समाजाला १०० टक्के सनदी देण्याचे लक्ष्य

अनुसूचित जमातींच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एसटी समाजासाठी भाजप सरकारने सर्वाधिक काम केले आहे. वन हक्क कायद्यांतर्गत आतापर्यंत २,५०० सनदी देण्यात आल्या असून येत्या १९ डिसेंबरपर्यंत १०० टक्के सनदी देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने ठरविल्याप्रमाणे एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्री आवास योजना’ लवकरच

राज्यातील मूळ गोमंतकीयांच्या घरांच्या प्रश्नावर बोलताना ‘मुख्यमंत्री आवास योजना’ पुढील काही दिवसांत सुरू करण्यात येणार असून, स्वतःचे घर किंवा फ्लॅट नसलेल्या मूळ गोमंतकीय व्यक्तींना छोटे घर अथवा फ्लॅट उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक गावात ज्येष्ठांसाठी आरोग्य उपक्रम

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक गावात लवकरच विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘माझे घर’ अंतर्गतही पुढील सहा महिन्यांत अनेक गोमंतकीयांना फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

तियात्रचा केंद्रीय कला-संस्कृती खात्यात समावेश

गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठीही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली. तियात्रचा केंद्रीय कला आणि संस्कृती खात्यामार्फत भारताच्या अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात रोजगारनिर्मिती, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, एसटी समाजाचे वनहक्क व राजकीय आरक्षण, सर्वसामान्यांसाठी घरे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर सरकार आगामी काळात विशेष भर देणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून स्पष्ट झाले.

  • Related Posts

    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    भरपाई, रोजगार आणि जमीन हक्कांबाबत जमीन मालकांचा जाब गांवकारी,दि.१(प्रतिनिधी) इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारण्यासाठी जमिनी घेताना स्थानिकांना दाखवलेली विकास आणि रोजगाराची स्वप्ने नेमकी कुठे गेली, असा सवाल उपस्थित करत तुयेतील…

    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    AICC General Secretary and Punjab in-charge Sachin Pilot will join the Congress party’s ongoing Goy Rakhonn Yatra in the Sakhlim (Sanquelim) constituency on October 2 as part of a special Gandhi Jayanti programme. Pilot will walk with the Yatris to highlight issues concerning Goa’s land, environment, employment, heritage, governance and identity.

    You Missed

    01/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 1, 2026
    • 12 views
    01/10/2026 e-paper

    कंत्राटी शिक्षकांना न्याय द्या

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 1, 2026
    • 17 views
    कंत्राटी शिक्षकांना न्याय द्या

    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 1, 2026
    • 20 views
    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 1, 2026
    • 24 views
    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 14 views
    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 29 views
    30/09/2026 e-paper