कारापूरवासियांना पोलिसांनी ताब्यात घेतले

आंदोलकांच्या समर्थनार्थ विरोधकांची एकजूट


गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी)

गोवा क्रांती दिनाच्या निमित्ताने कारापूर–सर्वणच्या विध्वंसक मेगा प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी पणजीत दाखल झालेल्या कारापूर–सर्वण गावच्या आंदोलकांना पोलिसांनी आझाद मैदानाजवळ अडविले. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन जुने गोवे पोलिस स्थानकात पोहोचवले. क्रांती दिनी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला अटकाव करून बेकायदा ताब्यात घेतल्याचा निषेध कारापूर–सर्वण ग्रामस्थांनी केला आहे.
कारापूरच्या आंदोलनाचा आजचा ७५ वा दिवस होता. येथील आझाद मैदानावर राज्य क्रांती दिन सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदीन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आदी उपस्थित होते. आझाद मैदानापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आंदोलकांना पोलिसांनी अडवले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने पोलिसांनी अखेर वाहने आणून आंदोलकांना जुने गोवे पोलिस स्थानकात नेले. कुठल्या कायद्याखाली आंदोलकांना ताब्यात घेतले, असे विचारले असता पोलिसांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी काही आंदोलकांची नावे घेतल्याची माहिती डॉ. स्वप्नील सालेलकर यांनी दिली.
विरोधकांची एकजूट
कारापूरवासियांना ताब्यात घेतल्यानंतर आझाद मैदानावर उपस्थित विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या घटनेचा निषेध केला. क्रांती दिन हा अभिव्यक्तीचा दिवस असूनही या दिवशी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकांना अटक करण्याचे प्रयोजन काय, असा सवाल त्यांनी केला. आंदोलकांच्या प्रश्नांची उत्तरेच सरकारकडे नसल्याने सरकार पळपुटेपणा करत असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनीही आंदोलकांच्या अटकेचा निषेध केला. भाजपची राजवट ही सालाझारशाहीची राजवट असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलकांना जुने गोवे येथे नेल्याची वार्ता कळताच आम आदमी पार्टीचे आमदार क्रुझ सिल्वा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई आदी तिथे दाखल झाले. या सर्वांनी अटकेचा निषेध केला.
आंदोलकांना जिथून उचलले तिथे जोपर्यंत पोहोचवले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. डॉ. सालेलकर यांनी जुने गोवे पोलिस स्थानकाबाहेरच ठाण मांडून बसणार असल्याचे सांगितले. आंदोलकांसोबत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, अभिजीत प्रभूदेसाई, रामा काणकोणकर आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

    आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांचे निवेदनगांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी): आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडे सविस्तर…

    Educationist Pandurang Nadkarni Calls for Major Reforms in Goa’s Education System to Improve Competitive Exam Readiness

    Educationist Pandurang Nadkarni has urged the Goa government to undertake comprehensive reforms in the state’s education system. He criticises the current memory-based learning, advocating for concept-based education, an end to dependence on guides, and quality teaching to better prepare students for competitive examinations and real-world challenges.

    You Missed

    गोवा क्रांती दिनी कारापूरचा सवाल

    गोवा क्रांती दिनी कारापूरचा सवाल

    18/06/2026 e-paper

    18/06/2026 e-paper

    कारापूरवासियांना पोलिसांनी ताब्यात घेतले

    कारापूरवासियांना पोलिसांनी ताब्यात घेतले

    Complaint Seeks Transfer of Motor Vehicle Inspectors at Goa Border Checkposts

    Complaint Seeks Transfer of Motor Vehicle Inspectors at Goa Border Checkposts

    17/06/2026 e-paper

    17/06/2026 e-paper

    भ्रष्टाचार विषयच गायब !

    भ्रष्टाचार विषयच गायब !