खर्गे काँग्रेसमध्ये जीव ओतणार?

पक्षात उत्साहाचे वातावरण, इच्छुकांत रस्सीखेच

गांवकारी, दि.१७ (प्रतिनिधी)
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आज, सोमवारी गोवा दौऱ्यावर येत असून प्रथमच राज्यातील बीएलए आणि बूथस्तरीय कार्यकर्त्यांना ते थेट मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खर्गे यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक होणार असून त्यात राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष आणि आमदार या समितीचे सदस्य आहेत.

खर्गे यांच्या स्वागतासाठी काँग्रेसने तयारी केली असून त्यांच्या दौऱ्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बूथ पातळीवर पक्षसंघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे आणि आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना दिशा देणे यावर त्यांच्या दौऱ्यात भर राहणार आहे.

दरम्यान, भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने समिती स्थापन केली असून संभाव्य आघाडीबाबतही पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. त्यामुळे खर्गे यांच्या गोवा दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खर्गेंच्या भेटीत काँग्रेसला धक्का!

खर्गे यांच्या गोवा भेटीच्या दिवशीच १०८ बीएलएंनी राजीनामे दिल्याचा दावा समोर आला आहे. बैठकीसाठी बूथ कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप असून, आणखी २०० हून अधिक बीएलए राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. खर्गेंच्या भेटीतच झालेली ही घडामोड काँग्रेससाठी उत्साहभंग करणारी ठरली आहे.

  • Related Posts

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Goa University is preparing for a leadership transition, and the selection of its 10th Vice-Chancellor is crucial. After five years marked by academic reforms and controversies, the new appointment will determine the university’s direction for years to come, requiring a leader who can restore trust, transparency, academic freedom, and institutional excellence.

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी अथवा अन्य स्वरूपात १० वर्षापासून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…

    You Missed

    17/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 17, 2026
    • 13 views
    17/08/2026 e-paper

    खर्गे काँग्रेसमध्ये जीव ओतणार?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 17, 2026
    • 19 views
    खर्गे काँग्रेसमध्ये जीव ओतणार?

    गोष्ट विकासाच्या सांडपाण्याची…

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 17, 2026
    • 20 views
    गोष्ट विकासाच्या सांडपाण्याची…

    Will Social Service Translate into Votes? Neha Gawas Emerges as Strong Contender for Cumbharjua

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 17, 2026
    • 14 views
    Will Social Service Translate into Votes? Neha Gawas Emerges as Strong Contender for Cumbharjua

    BJP Government Has Failed Goa on Governance, Law and Protection: Johnson D’Silva

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 17, 2026
    • 28 views
    BJP Government Has Failed Goa on Governance, Law and Protection: Johnson D’Silva

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 22 views
    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या