लवकरच पितळ उघड करू

नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांचा इशारा

गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)

मागील सहा महिन्यांत आपण अनेक टीका सहन केल्या. मात्र आता निवडणुका जवळ आल्या आहेत आणि या काळात आपण वेगळ्या पद्धतीने बोलणार आहोत. काही लोकांचे पितळ लवकरच उघडे होणार असल्याचे स्पष्ट संकेत नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिले.
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, नगर नियोजन खात्याने शेतजमीन, ओलीतक्षेत्र तसेच इतर संवेदनशील क्षेत्रांचा समावेश विकासबाह्य क्षेत्र म्हणजेच नो डेव्हलपमेंट एरिया मध्ये केला आहे. सुमारे एक कोटी चौ.मी. जमीन या क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत आपण यापूर्वीच वरिष्ठांना आणि पक्ष नेतृत्वाला कल्पना दिली असून, हा निर्णय कदापी मागे घेणार नाही, असे त्यांनी ठामपणे जाहीर केले.
यावेळी त्यांनी एका आमदाराकडून आलेला कौतुकाचा संदेश आणि मुख्यमंत्रीपदासाठी दिलेल्या शुभेच्छा दाखवून दिल्या. मात्र काही आमदारांनी राजकारणातील नैतिकता आणि मूल्ये सोडून दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मतदारसंघातील जमीन विकासबाह्य क्षेत्रात समाविष्ट करू नये, अशी विनंती एका आमदाराने केली होती. पण त्याच वेळी मुख्यमंत्र्यांकडे भलतेच सांगून दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझे नेते
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच माझे नेते आहेत. कुठल्याही विषयावर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना विश्वासात घेऊनच आपण निर्णय घेतो. मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देऊन मागे भलतेच सांगून पक्ष नेतृत्वाच्या मनात गैरसमज पसरविणाऱ्यांचे लवकरच पितळ उघडे करू, असेही संकेत विश्वजीत राणे यांनी दिले.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………

आता ‘माझे अॅप ड्रायव्हर’वर
बुक करा मोटरसायकल पायलट

गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)

गोव्याची वेगळी ओळख बनलेल्या मोटरसायकल पायलटची बुकिंग आता ग्राहकांना माझे अॅप ड्रायव्हर वरून करता येणार आहे. या उपक्रमामुळे मोटरसायकल व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात गोवा मोटरसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशन आणि वाहतूक खात्याच्या समन्वयातून विकसित करण्यात आलेल्या माझे अॅप ड्रायव्हर या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदीन्हो उपस्थित होते.
गोव्याचे रेबेका लोबो आणि सॅम्युअल टिमोथी यांनी हे अॅप विकसित केले आहे. गोव्याचे हे हायपरलोकल अॅप स्थानिक नागरिक, पर्यटक, नोंदणीकृत व्यवसाय, मोटरसायकल टॅक्सी पायलट, डिलिव्हरी सेवा आणि इतर समुदायाधारित सेवांना एकाच व्यासपीठावर आणणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
या उपक्रमामुळे पारंपरिक मोटरसायकल टॅक्सी पायलटांना डिजिटल माध्यमातून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल. स्मार्टफोन नसलेल्या पायलटांनाही या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक मदत केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, ५० वर्षांवरील पारंपरिक मोटरसायकल टॅक्सी पायलटांचा १ ऑगस्टपासून दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत समावेश केला जाईल. तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पारंपरिक पायलटांना ई-बाईक खरेदीवर ५० टक्के अनुदान देण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 10 views
    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 23 views
    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 16 views
    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 19 views
    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 18 views
    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 18 views
    गडकरींना काळे झेंडे दाखवणार