परशुरामाच्या नावाने धार्मिक विषवल्ली

गौतम खट्टर, श्रीहरी आठल्ले विरोधात आक्रोश

गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी)

श्री परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांत ख्रिस्तधर्मीय संत सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल अत्यंत हीन दर्जाचे आणि आक्षेपार्ह विधानांचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. वास्को येथे गौतम खट्टर आणि पणजी येथे श्रीहरी आठल्ले यांनी केलेल्या विधानांबाबत पोलिस तक्रार दाखल झाली आहे. खट्टर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून आठल्ले यांच्या तक्रारीसंबंधी चौकशी सुरू आहे.
वास्कोतील वादग्रस्त भाषण
वास्को येथे परशुराम जयंती कार्यक्रमात गौतम खट्टर यांनी आपल्या भाषणात झेवियर यांचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केला. याशिवाय त्यांनी अत्यंत हीन पद्धतीने त्यांचा उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन आयोजकांनी तातडीने लोकांची माफी मागितली आणि हा दुर्दैवी प्रकार असल्याचे स्पष्ट केले. वास्को पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून संशयिताला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मंत्री मॉविन गुदीन्हो यांच्यावर टीका
या कार्यक्रमात उपस्थित पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी वक्त्याला रोखायला हवे होते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले. गुदीन्हो यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांनी भाषण थांबवण्याची चिठ्ठी पाठवली होती, परंतु लोकांच्या मागणीमुळे भाषण सुरू ठेवण्यात आले. त्यांनी म्हटले की भाषण रोखले असते तर गोंधळ निर्माण झाला असता. दरम्यान, गुदीन्हो यांनी व्यासपीठावरून अप्रत्यक्ष विरोधकांवर टीका केल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून मंत्रीपद काढून घेण्याची मागणी केली आहे.
पणजीतील सनसनाटी भाषण
पणजी येथे परशुराम जयंतीनिमित्त आयोजित सरकारी कार्यक्रमात विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्थेशी संबंधित प्रमुख वक्ते श्रीहरी आठल्ले यांनी स्फोटक भाषण केले. परशुराम यांची माहिती देताना त्यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर टीका केली. भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे त्यांनी सांगितले. हे भाषण भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या उपस्थितीत झाले.
सर्वत्र निषेधाची लाट
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल केलेल्या विधानांचा विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही तीव्र निषेध केला. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी म्हटले की, जात, धर्म किंवा पंथ बाजूला ठेवून सर्व गोमंतकीय या बेजबाबदार विधानाचा निषेध करत आहेत. आरजीपीचे नेते मनोज परब यांनी खट्टर यांचे भाषण संपूर्ण गोमंतकीयांच्या भावना दुखावणारे असल्याचे सांगितले. आमदार वीरेश बोरकर यांनी सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.
गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकार आणि पोलिसांना धारेवर धरले. त्यांनी म्हटले की, सेंट फ्रान्सिस झेवियर यांना ‘दहशतवादी’ संबोधणे हा जगभरातील कोट्यवधी भाविकांचा अपमान आहे. दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भाजपवर आरोप करताना हे जनतेत फूट पाडण्याचे कारस्थान असल्याचे म्हटले. ॲडव्होकेट प्रतिमा कुतिन्हो यांनी कायदेशीर लढा पुकारला आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर ओलेंसिओ सिमोईस, वॉरेन आलेमाव आणि प्रतिमा कुतिन्हो यांनी नागरिकांसह पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांची भेट घेतली.

  • Related Posts

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    काँग्रेस नेत्यांनी आरोप केला आहे की, गेल्या पंधरा वर्षांत उत्तर गोव्यात सत्ताधारी नेत्यांचाच विकास झाला असून, गोव्याच्या जमिनी बिल्डर लॉबी आणि खासगी विद्यापीठांच्या घशात घालण्याचे काम केले जात आहे.

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    रमेश तवडकर यांना पूर्ण विश्वास गांवकारी,दि.३०(प्रतिनिधी) राज्यातील अनुसुचित जमातीला राजकीय आरक्षणाच्या विषयावर आपण केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी उपेंद्र जोशी यांच्यामार्फत या गोष्टीकडे आपण जातीने लक्ष ठेवून…

    You Missed

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 11 views
    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 22 views
    30/09/2026 e-paper

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 22 views
    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 26 views
    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 28 views
    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 19 views
    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain