प्रभू व्हायोलेटा संकुलातील बोअरवेल सील

सोमवारी संपूर्ण संकुलाची पाहणी
गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी)

दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा निवासी संकुलात झालेल्या अतिसार (डायरिया) उद्रेकामुळे सरकारी यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषित बोअरवेल सील केली आहे. विविध सरकारी यंत्रणा आणि स्थानिक पंचायतीकडून सोमवारी पाहणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
१२ मार्चपासून आतापर्यंत एकूण १५६ रुग्णांची नोंद झाली आहे. दोन रुग्णांना टायफॉईड झाल्याचा संशय असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कुठ्ठाळी आरोग्य केंद्राकडून संकुलातील सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांना आवश्यक औषधे, ओआरएस तसेच नमुने तपासण्याचे काम सुरू आहे. आरोग्य विभागाने संकुलातील पाच इमारतींमधील ३२८ फ्लॅट्समध्ये तपासणी केली आहे.

सांडपाणी प्रकल्पाच्या बिघाडामुळे पाण्याचे दूषितीकरण
जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची तपासणी करून बोअरवेल सील केली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासंबंधीची कारवाई गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे केली जाणार आहे. मंडळाकडून बिल्डरला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.

प्रदूषण उल्लंघन उघड
१६ मार्च रोजी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यरित्या कार्यरत नसल्याचे आढळले. पाण्याच्या नमुन्यांमध्ये बीओडी, सीओडी, अमोनियाकल नायट्रोजन, सस्पेंडेड सॉलिड्स आणि फिकल कोलिफॉर्म यांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले. मंडळाने बिल्डरला तत्काळ सांडपाणी सोडणे थांबवण्याचे निर्देश दिले असून, प्रकल्प पूर्ववत कार्यान्वित होईपर्यंत सांडपाणी सरकारी प्रकल्पाकडे पाठवण्यास सांगितले आहे. तसेच, प्रकल्पाकडे ‘कन्सेंट टू ऑपरेट’ नसल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

दंड नोटीस व ४८ तासांची मुदत
प्रदूषण नियंत्रण मंडळाने बिल्डरला सुमारे ४४.५ लाख रुपयांची पर्यावरण भरपाई आणि १२.५ लाख रुपयांचा अतिरिक्त दंड प्रस्तावित करत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सरकारी यंत्रणांकडून बिल्डरला संरक्षण
प्रभू व्हायोलेटा संकुलातील या प्रदूषित पाण्यासंबंधी यापूर्वी अनेकदा सरकारी यंत्रणांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु बिल्डरकडून रहिवाशांवर उलट्या तक्रारी करून स्थानिकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे मुकाट्याने हे सगळे सहन करण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. लोकांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचेही लोकांनी सांगितले.

  • Related Posts

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार!

    ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल. सांगे मतदारसंघात काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार! ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल

    सांगे मतदारसंघात गेल्या २६ वर्षांपासून असलेला काँग्रेसचा राजकीय दुष्काळ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. ‘गोंय राखण यात्रे’च्या २२व्या दिवशी सांगेत झालेल्या सभेत खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधीचा कथित गैरवापर, बेरोजगारी आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यांवरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

    You Missed

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार!

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 14 views
    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार!

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार! ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 20 views
    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार! ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल

    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 13 views
    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    15/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 24 views
    15/10/2026 e-paper

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 28 views
    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 26 views
    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार