सांगेतील आदिवासी नेते सत्यवान गावंकर शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये

पणजी, दि. २९ जुलै २०२६ : सांगे मतदारसंघातील प्रमुख आदिवासी नेते सत्यवान गावंकर यांनी बुधवारी पत्नी नीता गावंकर आणि शेकडो समर्थकांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. पणजी येथील गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

 

या प्रवेश सोहळ्याला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष ॲड. कार्लोस आल्वारेस फेरेरा व सुनील कवठणकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष राजेश वेरेकर, माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, ओबीसी विभागाचे अध्यक्ष शरद चोपडेकर, गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आर्चित नाईक, सांगे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष डायगो फर्नांडिस तसेच ज्येष्ठ काँग्रेस नेते रजनीकांत नाईक, कायतानो मार्टिन्स, जितेंद्र नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्यवान गावंकर व नीता गावंकर यांच्यासमवेत विशाल नाईक, प्राजोक कुर्डीकर, फ्रान्सिस फर्नांडिस, पुटू गावंकर, मिलन गावंकर, तन्वी गावंकर, रुजारियो कार्व्हालो, ॲलेक्स फर्नांडिस, संजना देसाई, अनिश गावंकर, संगम गावंकर, कृष गावंकर, अभय गावंकर, विक्रांत गावंकर, पूजा गावंकर, लक्ष्मी गावंकर, संजना गावंकर आणि रुपाली नाईक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सांगे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष डायगो फर्नांडिस यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नव्या सदस्यांचे प्रवेश अर्ज गिरीश चोडणकर आणि राजेश वेरेकर यांनी स्वीकारले. माणिकराव ठाकरे यांनी सत्यवान गावंकर व नीता गावंकर यांना काँग्रेसची शाल परिधान करून त्यांचे स्वागत केले, तर ॲड. कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनी त्यांना पक्षाचा ध्वज प्रदान केला.

आदिवासी नेतृत्वाला अधिक संधी देणार : ठाकरे

यावेळी माणिकराव ठाकरे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील भूमिकेचा उल्लेख केला. काँग्रेस पक्ष आदिवासी समाजाला नेहमीच ‘आदिवासी’ म्हणून सन्मानाने संबोधतो आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करीत आला आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजप आदिवासी समाजाला ‘वनवासी’ म्हणून संबोधून त्यांच्या मूळ ओळखीला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. काँग्रेसमध्ये आदिवासी नेतृत्वाचे सदैव स्वागत असून, या समाजातील नेत्यांना अधिक जबाबदाऱ्या देऊन पुढे आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सत्यवान गावंकर काँग्रेसच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सांगेत काँग्रेसची ताकद वाढेल : चोडणकर

गिरीश चोडणकर यांनी सत्यवान गावंकर आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करताना या प्रवेशामुळे सांगे मतदारसंघात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढणार असून तळागाळात पक्ष अधिक सक्षम होईल, असा दावा केला.

चोडणकर यांनी अनुसूचित जमाती उपयोजनेअंतर्गत कायदेशीर तरतुदीनुसार ₹३,२०० कोटींची तरतूद का करण्यात आली नाही, याचे उत्तर भाजप सरकारने द्यावे, असे खुले आव्हान दिले.

“भाजप सरकार अनुसूचित जमाती समाजाला विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण देणार नाही, असे मी यापूर्वीच स्पष्टपणे सांगितले होते. आज तीच वस्तुस्थिती समोर आली आहे. भाजपची आदिवासी समाजाला न्याय देण्याची प्रामाणिक इच्छा नाही. विविध समाजांचा केवळ मतांसाठी वापर करणे हेच भाजपचे धोरण राहिले आहे,” असा आरोप चोडणकर यांनी केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोवा प्रदेश काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केले, तर ज्येष्ठ काँग्रेस नेते रजनीकांत नाईक यांनी आभार मानले.

  • Related Posts

    आरक्षणावरून सरकार कोंडीत!

    मंत्री रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीला जाणार ……………………………………………………………………………………………….. गांवकारी, ३१ ऑक्टोबर (प्रतिनिधी) गोवा विधानसभेच्या २०२७ मधील निवडणुकीत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्याची ग्वाही देणारे राज्य सरकार आता…

    Forest Department Inspects Alleged Illegal Tree Felling Above Iconic Pomburpa Spring

    A joint team of Forest Department officials conducted a site inspection above the iconic Pomburpa Spring, following complaints of continued destruction of a notified private forest.

    You Missed

    31/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 31, 2026
    • 15 views
    31/10/2026 e-paper

    आपत्ती व्यवस्थापन की आपत्तीचा तमाशा?

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 31, 2026
    • 21 views
    आपत्ती व्यवस्थापन की आपत्तीचा तमाशा?

    आरक्षणावरून सरकार कोंडीत!

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 31, 2026
    • 16 views
    आरक्षणावरून सरकार कोंडीत!

    Forest Department Inspects Alleged Illegal Tree Felling Above Iconic Pomburpa Spring

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 31, 2026
    • 16 views
    Forest Department Inspects Alleged Illegal Tree Felling Above Iconic Pomburpa Spring

    Goa Government to Move Supreme Court Over ST Political Reservation

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 31, 2026
    • 27 views
    Goa Government to Move Supreme Court Over ST Political Reservation

    30/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 30, 2026
    • 30 views
    30/10/2026 e-paper