सावर्डेला व्यसनमुक्तीचे ‘संकेत’ !

धारबांदोडा, दि. १० (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यातील दुर्गम धारबांदोडा तालुक्यात आता एका सकारात्मक सामाजिक परिवर्तनाची चाहूल लागली आहे. सावर्डे मतदारसंघातील तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी भाजपचे युवा नेते संकेत आर्सेकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून उभी राहत असलेली ही चळवळ म्हणजे ‘व्यसनमुक्त सावर्डे’च्या उज्ज्वल भविष्याचे आशादायी संकेत मानले जात आहेत.

व्यसनामुळे एखाद्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होतेच; पण त्याच्यासोबत त्याचे संपूर्ण कुटुंबही दररोज वेदना सहन करीत असते. आई-वडिलांच्या डोळ्यांतील चिंता, मुलाच्या भविष्याबद्दलची असहायता आणि घरातील विस्कटत चाललेले वातावरण पाहून आर्सेकर यांनी या प्रश्नाकडे केवळ राजकीय नव्हे, तर मानवी संवेदनांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा निर्णय घेतला.

तरुणांना केवळ व्यसन सोडण्याचा उपदेश करून हा प्रश्न सुटणार नाही; त्यांच्या हाताला विधायक काम, मनाला सकारात्मक ध्येय आणि आयुष्याला योग्य दिशा देणे आवश्यक आहे, ही बाब त्यांनी ओळखली. याच विचारातून युवकांना विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांशी जोडण्यास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक मूल्यांचे धडे देतानाच गोरक्षा, समाजसेवा, क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यात आला. या प्रयत्नांमुळे अनेक तरुणांची ऊर्जा विधायक कार्याकडे वळत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

या सामाजिक प्रयोगाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे सावर्डे मतदारसंघात त्याची चर्चा सुरू झाली आहे. व्यसनात अडकलेल्या युवकांना पुन्हा आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी सुरू झालेली ही धडपड अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

राजकीय कार्यक्रमांनाही ‘ड्राय’ संस्कृती

राजकारण आणि दारूच्या पार्ट्या यांचे नाते जणू अविभाज्यच असल्याचा समज अनेक ठिकाणी रूढ झाला आहे. विशेषतः सभा, बैठका, वाढदिवस, सहली किंवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये मद्याचा वापर होणे सामान्य मानले जाते. संकेत आर्सेकर यांनी मात्र या प्रथेला स्पष्टपणे नकार दिला आहे.

“ज्या कार्यक्रमात मद्य असेल, त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडली आहे. राजकीय सभा असो, वाढदिवस असो किंवा कार्यकर्त्यांची सहल. कोणत्याही कार्यक्रमात मद्याला स्थान नसावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. परिणामी सावर्डेतील अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम आता ‘ड्राय’ होऊ लागले आहेत.

मतांसाठी मद्यवाटप किंवा तरुणांना व्यसनाकडे ढकलण्याऐवजी त्यांना व्यसनापासून दूर ठेवणारा युवा नेता पाहून पालक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. “आमच्या मुलांना व्यसन लावणारे अनेक जण पाहिले; पण व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देणारा आणि त्यासाठी स्वतः पुढाकार घेणारा हा तरुण कोण?” असा आश्चर्य आणि कौतुकमिश्रित प्रश्न आता सावर्डेतील अनेक घरांतून विचारला जात आहे.

मतांपेक्षा तरुणांचे भविष्य महत्त्वाचे

राजकारणात यश मिळेल किंवा नाही, हे काळ ठरवेल; मात्र मतांसाठी अथवा राजकीय फायद्यासाठी व्यसनाशी कोणतीही तडजोड करणार नाही, असा निर्धार संकेत आर्सेकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पारंपरिक राजकीय पद्धतींसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे.

व्यसनाच्या अंधारात हरवणाऱ्या तरुणांच्या हातात दारूची बाटली नव्हे, तर उज्ज्वल भविष्याचे स्वप्न असावे; त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत अश्रू नव्हे, तर अभिमान दिसावा याच भावनेतून ही चळवळ पुढे जात आहे.

ही मोहीम किती व्यापक बनेल आणि तिचे राजकीय परिणाम काय होतील, हे भविष्यकाळात स्पष्ट होईल. मात्र एका तरुणाच्या सकारात्मक संकल्पामुळे सावर्डेतील अनेक कुटुंबांच्या मनात आशेचा दिवा प्रज्वलित झाला आहे. व्यसनाच्या गर्तेतून तरुणाईला बाहेर काढण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे खऱ्या अर्थाने नव्या, सक्षम आणि व्यसनमुक्त सावर्डेचे स्पष्ट ‘संकेत’ आहेत.

  • Related Posts

    ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

    देशभरातून मागणीला जोर; गोवा काँग्रेसकडूनही चौकशीची मागणी गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (एसआयआर) निर्माण झालेला वाद आता गोव्यातही तीव्र झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच…

    ‘Dilapidated’ Ganesh Mandap Hosts Chaturthi Celebrations; Prabhav Naik Seeks Answers

    Madganvcho Awaaz and youth leader Prabhav Naik has questioned the justification for the proposed demolition and redevelopment of the Ganesh Mandap at the Margao Municipal Garden, pointing out that the structure—described in official correspondence as being in a “very dilapidated condition”—was used to host this year’s Ganesh Chaturthi celebrations.

    You Missed

    25/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 25, 2026
    • 14 views
    25/09/2026 e-paper

    ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 25, 2026
    • 18 views
    ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

    गोव्याची आर्थिक प्रगती की अधोगती?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 25, 2026
    • 12 views
    गोव्याची आर्थिक प्रगती की अधोगती?

    ‘Dilapidated’ Ganesh Mandap Hosts Chaturthi Celebrations; Prabhav Naik Seeks Answers

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 25, 2026
    • 15 views
    ‘Dilapidated’ Ganesh Mandap Hosts Chaturthi Celebrations; Prabhav Naik Seeks Answers

    Sandeep Falari Announces Bid for BJP Ticket from Mapusa Assembly Constituency

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 25, 2026
    • 13 views
    Sandeep Falari Announces Bid for BJP Ticket from Mapusa Assembly Constituency

    अँटनींच्या पुत्राला गोवा सह-प्रभारीपद; पर्रीकरांच्या पुत्राबाबत भाजपची भूमिका काय?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 25, 2026
    • 15 views
    अँटनींच्या पुत्राला गोवा सह-प्रभारीपद; पर्रीकरांच्या पुत्राबाबत भाजपची भूमिका काय?