तरुण तेहलानी यांना टीसीपीचा दणका

नगर नियोजन विभागाकडून तांत्रिक परवाना मागे

गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी)

बार्देश तालुक्यातील साल्वादोर दो मुंद पंचायत क्षेत्रातील एकोशी येथे नियोजित निवासी प्रकल्पासाठी मिळालेली तांत्रिक मंजुरी अखेर नगर नियोजन विभागाने रद्द केली आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर तरुण तेहलानी यांच्या या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मोठा धक्का बसला आहे.
३ फेब्रुवारी २०२३ रोजी या प्रकल्पाला “पास्ट कमिटमेंट” तरतुदींवर आधारित मंजुरी देण्यात आली होती. मात्र सामाजिक कार्यकर्ते धिरेंद्र फडते व इतरांनी या मंजुरीविरोधात सातत्याने तक्रारी दाखल केल्या. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने प्रादेशिक आराखडा २०२१ लागू करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर पंचायतीने कामबंदची नोटीस जारी केली होती.
उत्तर गोवा जिल्हा नगर नियोजन कार्यालयाने ५ मे २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व्हे क्रमांक २९२/१-एल-७ येथील निवासी घराचे सुधारित बांधकाम, स्टाफ क्वार्टर्स, स्विमिंग पूल व कंपाऊंड वॉल यासाठी दिलेली मंजुरी रद्द करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे “पास्ट कमिटमेंट” तरतुदींवरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तरुण तेहलानी यांच्या प्रकल्पाला मोठा धक्का बसला असून, सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गावांतून त्यांचे कौतुक होत आहे.

  • Related Posts

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    कुंकळळी, दि. १६ : गोमंतकाच्या अस्तित्वासाठी, धर्मरक्षणासाठी आणि स्वराज्याच्या संकल्पनेसाठी १५८३ मध्ये कुंकळळीच्या महानायकांनी दिलेल्या बलिदानाला इतिहासात तोड नाही. त्यांच्या त्यागामुळेच गोमंतकीय समाज आपली संस्कृती, धर्म आणि अस्मिता जपू शकला,…

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    पणजी, दि. १६: गोव्यात ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) इंधनाची सर्वसाधारण अंमलबजावणी तात्काळ स्थगित करून त्याबाबत स्वतंत्र वैज्ञानिक, आर्थिक आणि पर्यावरणीय अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस…

    You Missed

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    • By Gaonkaari
    • जुलै 16, 2026
    • 11 views
    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    • By Gaonkaari
    • जुलै 16, 2026
    • 17 views
    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    • By Gaonkaari
    • जुलै 16, 2026
    • 16 views
    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    16/07/2026 e-paper

    16/07/2026 e-paper

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    • By Gaonkaari
    • जुलै 16, 2026
    • 19 views
    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार

    • By Gaonkaari
    • जुलै 16, 2026
    • 16 views
    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार