‘ती’ ४६ घरे कुणाची; म्हापसा की आसगांवची ?

अधिकारक्षेत्र पडताळणीसाठी सर्वेक्षण खात्याला पत्र

म्हापसा,दि.३०(प्रतिनिधी)

बार्देश तालुक्यातील आसगांव कोमुनिदादच्या मालकीच्या जागेत लक्ष्मीनगर नामक तयार झालेल्या वसाहतीतील ४६ घरे आसगांव पंचायत की म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. या वादात या ४६ घरांचे भवितव्य अधांतरी बनले आहे.

आत्माराम गडेकर यांची तक्रार
आरटीआय कार्यकर्ते आत्माराम गडेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत आसगांव कोमुनिदादच्या जागेत एकूण ४६ घरे उभी राहीली आहेत. या घरांच्या वसाहतीला लक्ष्मीनगर असे नाव देण्यात आले आहे. ही घरे आसगांव पंचायत क्षेत्रात येत असताना म्हापसा नगरपालिकेकडून या घरांची घरपट्टी वसुल करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हापला मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. म्हापसा नगरपालिकेच्या लोकांनी या घरपट्टीच्या आधारे याठिकाणी बेकायदा मतपेढी तयार केल्याची टीका गडेकर यांनी केली आहे.
आसगांव पंचायतीला पत्र
या लक्ष्मीनगर वसाहतीसंबंधीचे पत्र आत्माराम गडेकर यांनी आसगांव पंचायत तथा आसगांव कोमुनिदादला केले आहे. या पत्रावरून आसगांव पंचायतीने म्हापसा नगरपालिकेकडे स्पष्टीकरण मागीतले आहे. म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेटकर यांनी आसगांव पंचायतीला या जागेच्या अधिकारक्षेत्राबाबत सर्वेक्षण खात्याकडे स्पष्टीकरण मागतील्याचे पत्र पंचायतीला पाठवले आहे. म्हापसा नगरपालिकेला सर्वेक्षण खात्याकडे स्पष्टीकरण मागण्याची वेळ येणे ह्यावरूनच ही घरे म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, याबाबत पालिकेलाच खात्री नाही, हे उघड झाल्याचे गडेकर यांनी म्हटले आहे.
दक्षता खात्याकडेही तक्रार
तक्रारदार आत्माराम गडेकर यांनी बेकायदा घरांना घरक्रमांक दिल्याच्या हा विषय दक्षता खात्याकडे पोहचवला आहे. आसगांव कोमुनिदादच्या सर्वे क्रमांक १४५ मधील उपविभाग पाडून हे क्रमांक दिले गेले आहेत. २००१ मध्ये ३३, २००२ मध्ये १, २०१५ मध्ये १ आणि २०२४ मध्ये ११ घरांना घरक्रमांक दिल्याची माहिती आणि त्यासोबत घरपट्टी पावत्याही त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या आहेत.
म्हापसेकरांनो जागे व्हा- गडेकर
म्हापसा शहरात अशाच तऱ्हेने ठिकठिकाणी बेकायदा घरे, झोपडपट्टी उभारून मतपेढी तयार केली आहे. या मतपेढीच्या जोरावरच राजकारण केले जाते. या मतपेढीमुळेच आज म्हापसेकरांचे महत्व कमी होत चालले आहे. या मतपेढीच्या जोरावर म्हापसेकरांना लाचार बनवण्याचे प्रकार सुरू असून म्हापसा शहर वाचवायचे असेल आणि आपल्या ताब्यात ठेवायचे असेल तर ही बेकायदा मतपेढी तथा बेकायदा अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे,असे मत आत्माराम गडेकर यांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    टीकाकारांच्या तोंडाला कायदेशीर कुलुप पणजी,दि.२१(प्रतिनिधी)- सनबर्न महोत्सवाचे आयोजक स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा.लिमिटेड कंपनीकडून स्थानिक धारगळ पंचायतीचा ना हरकत दाखला. पर्यटन खात्याची तत्वतः मान्यता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून सशर्त…

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    खाते विश्वजीतांकडे, सेवावाढीची मेहरनजर मुख्यमंत्र्यांची पणजी,दि.२०(प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याचे मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांच्या सेवावाढीला नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांना जबाबदार धरले जाते. परंतु प्राप्त माहितीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    21/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 8 views
    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 3 views
    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 5 views
    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 7 views
    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!