पेपर ‘लिक’ प्रकरणाचा अहवालच ‘लिक’ !

डॉ. प्रणव नाईक यांच्या चारित्र्यहननाचा तीव्र निषेध

गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी)

गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील कथित पेपर लिक प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश आर.एम.एस. खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या सत्यशोधक समितीचा गोपनीय अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर करण्यात आला, त्याच दिवशी तो काही माध्यमांपर्यंत पोहोचल्याने ‘अहवालच लिक झाला’ का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
या अहवालाच्या आधारे संशयित प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांच्या चारित्र्यावर सरसकट आरोप करण्यात येत असून, या प्रकाराचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
सत्यशोधक समितीची स्थापना
पेपर लिक प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. संशयित प्राध्यापक डॉ. नाईक यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सत्यशोधक समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश आर. एम. एस. खांडेपारकर यांची नियुक्ती करण्यात आली, तर सदस्य म्हणून माजी पोलिस उपमहानिरीक्षक बॉस्को जॉर्ज, माजी कुलसचिव डॉ. राधिका नाईक आणि कायदा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. एम. आर. के. प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली होती.
गोपनीय अहवाल लिक आणि चारित्र्यहनन
या समितीने आपला गोपनीय अहवाल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना सादर केला. मात्र, त्याच दिवशी तो ठराविक माध्यमांमध्ये लिक झाला. अहवालात नेमके काय आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसताना, डॉ. प्रणव नाईक या युवा प्राध्यापकाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. या प्रकारामुळे डॉ. नाईक यांचे कुटुंब प्रचंड मानसिक तणावात आले आहे.
माध्यमांमध्ये पसरवण्यात आलेल्या बदनामीमुळे डॉ. नाईक वैफल्यग्रस्त झाले असून, काल ते अचानक अज्ञात स्थळी गेले. त्यानंतर त्यांनी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी खोटी बातमी प्रसारित करण्यात आली. ही बातमी जाणीवपूर्वक पसरवली जात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
अंतर्गत स्पर्धेचा बळी
गोवा विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापकांमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू असते. अनेकदा या स्पर्धेत वैयक्तिक बदनामी व एकमेकांना कमी दाखवण्याचा अट्टाहास केला जातो. भौतिकशास्त्र विभागातही अशाच अंतर्गत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रणव नाईक यांना लक्ष्य करण्यात आले असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
पेपर लिक प्रकरणाचा संबंध एका विद्यार्थिनीशी जोडून, ती डॉ. नाईक यांची प्रेयसी असल्याचा उल्लेख करत जाहीर वक्तव्यबाजी करणे हा अतिरेक असून, सरकारने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    This is an emotional plea from a Goan to Lord Ganesha, urging him to awaken the wisdom in the hearts of Goans to protect their land. The author expresses concern about unchecked development, the sale of land, and money-driven politics that threaten Goa’s natural beauty, cultural identity, and the future of its youth. The plea is for discernment, courage, and a collective resolve to prioritize Goa’s future over personal gain, ensuring it remains an invaluable homeland for generations to come.

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    A heartfelt plea from a Goan native to Lord Ganesha, urging for the preservation of Goa’s identity, land, and future against unchecked development, money-driven politics, and the commodification of ancestral land. The plea emphasizes the need for Goans to awaken, question leadership, and prioritize Goa’s future over personal gain.

    You Missed

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    गणेश विसर्जन स्थळाच्या स्वच्छतेसाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’चा पुढाकार

    गणेश विसर्जन स्थळाच्या स्वच्छतेसाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’चा पुढाकार