पुजाच्या गौप्यस्फोटाने ‘मंत्री’ हादरले

पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह

गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी)

सरकारी नोकऱ्यांसाठी रोख रक्कम घेण्यासंबंधीच्या घोटाळ्यात एक आयएएस अधिकारी, एक अभियंता आणि एक मंत्री असल्याचा मुख्य आरोपी पुजा नाईक हिचा गौप्यस्फोट झाल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ हादरले आहे. “हा मंत्री कोण?” अशी चर्चा सर्वत्र सुरू झाल्यामुळे सरकारची अधिकच कोंडी झाली आहे.
गुन्हा शाखेकडे पुजा नाईक हिने ही नावे उघड केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. गुन्हा शाखेकडून पुजा नाईक हिच्या जबानीची सविस्तर माहिती घेतली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. पुजा नाईक हिच्या जबानीत गांभीर्य असेल, तर या तिघांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाईल, असेही डॉ. सावंत म्हणाले.
तो आयएएस अधिकारी कोण?
नोकर भरती प्रकरणात पुजा नाईक हिने नाव घेतलेला आयएएस अधिकारी कोण, असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे. पुजा नाईक हिची त्या आयएएस अधिकाऱ्याशी ओळख कशी झाली, हाही प्रश्न निर्माण झाला आहे. खात्रीलायक माहितीनुसार, गोवा प्रशासकीय सेवेतील बढती मिळवून आयएएस बनलेला हा स्थानिक अधिकारी असल्याचे समजते. सार्वजनिक बांधकाम खात्यातील एक वरिष्ठ अभियंता, ज्याला सरकारने सेवावाढ दिली आहे, त्याचाही या प्रकरणात समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. ही नावे पुजा नाईक हिने पोलिसांसमोर उघड केली असली, तरी तिच्या जबानीची सत्यता पडताळल्यानंतरच ती नावे उघड करता येतील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
मंत्री हादरले
पुजा नाईक प्रकरणी वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी “पुजा नाईक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुणाचेही नाव घेऊ शकते,” असे म्हटले. या प्रकरणी पोलिस तपासावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. फोंडा येथे एका शिक्षक भरती प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केला नाही, असेही त्यांनी सांगितले. “केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठीही अशी वक्तव्ये केली जाऊ शकतात,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुजा नाईक हिची जबानी नोंदवली गेली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

  • Related Posts

    वाडे-कुर्डी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जीएसएससी परीक्षांसाठी मोफत कोचिंग

    गांवकारी, दि. १६ प्रतिनिधी:स्थानिक युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पी. एम. श्री सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, वाडे-कुर्डी यांनी कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी शाळेतर्फे…

    सुर्लातील खाण भरपाईचे राजकारण ?

    शेतकऱ्यांत तीव्र नाराजी; ग्राम कृती समिती अंधारात गांवकारी, दि. १६ (प्रतिनिधी) सुर्ला ग्राम कृती समितीने खाण कंपन्यांविरोधात दीर्घ लढा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयीन…

    You Missed

    वाडे-कुर्डी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जीएसएससी परीक्षांसाठी मोफत कोचिंग

    वाडे-कुर्डी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जीएसएससी परीक्षांसाठी मोफत कोचिंग

    सुर्लातील खाण भरपाईचे राजकारण ?

    सुर्लातील खाण भरपाईचे राजकारण ?

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    मायेची सावली हरपली…

    मायेची सावली हरपली…

    गोव्याला जबाबदार विरोधकांची गरज

    गोव्याला जबाबदार विरोधकांची गरज

    Goa’s Future Rests on the Shoulders of Youth

    Goa’s Future Rests on the Shoulders of Youth