राज्यातील मतदार यादीत ३१,८१५ नव्या नावांची भर

४ जानेवारीला अंतिम मतदार यादी
————————————————————————————————–
गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)
राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत आतापर्यंत ३१,८१५ नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली असून सुमारे ११ हजार नावे वगळण्यात आली आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. संजय गोयल यांनी ही माहिती दिली. अंतिम मतदार यादी ४ जानेवारी २०२७ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत डॉ. गोयल यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. या प्रक्रियेत नवीन मतदारांची नोंदणी तसेच मतदार यादीतील नावे वगळण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रितेश साळगावकर यांच्याशी संबंधित मतदारांची नावे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

आरजीपीच्या नेतृत्वाचा वाद निवडणूक आयोगाकडे
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजीपी) नेतृत्वावरून निर्माण झालेल्या वादाचा अंतिम निर्णय भारतीय निवडणूक आयोग घेणार असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. संजय गोयल यांनी स्पष्ट केले.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आरजीपीच्या दोन वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने पक्षातील नेतृत्वाचा वाद पुन्हा चर्चेत आला.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे अधिकृत नेतृत्व म्हणून कोणत्या गटाला मान्यता द्यायची, याचा निर्णय राज्य निवडणूक कार्यालयाच्या पातळीवर न होता भारतीय निवडणूक आयोगाकडून घेतला जाईल, असे डॉ. गोयल यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    उगवेतील बेकायदा रेती उपसा रोखा

    सरपंच सुबोध महाले यांचे पोलिसांना पत्र —————————- गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) : पेडणे तालुक्यातील उगवे गावात तेरेखोल नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित बेकायदा रेती उपशाविरोधात तांबोसे-मोपा-उगवे ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली आहे.…

    लैंगिक अत्याचार प्रकरणांनी गोवा हादरला

    काणकोणात नवे प्रकरण उघडकीस म्हापसा प्रकरणी संशयित जेरबंद ———————— गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) : राज्यातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. म्हापसा येथे दिवाळीच्या दिवशी चार वर्षीय बालिकेवर…

    You Missed

    Tuem Nagrik Samiti Serves Legal Notice on Chief Secretary Over ₹140-Crore Convention Centre

    Tuem Nagrik Samiti Serves Legal Notice on Chief Secretary Over ₹140-Crore Convention Centre

    राज्यातील मतदार यादीत ३१,८१५ नव्या नावांची भर

    राज्यातील मतदार यादीत ३१,८१५ नव्या नावांची भर

    12/11/2026 e-paper

    12/11/2026 e-paper

    गोवा बनतोय सायबर गुन्हेगारीचा अड्डा?

    गोवा बनतोय सायबर गुन्हेगारीचा अड्डा?

    प्रशासनाचे ‘बॉस’ कोण ?

    प्रशासनाचे ‘बॉस’ कोण ?

    Who Is the Real Boss of Goa’s Administration?

    Who Is the Real Boss of Goa’s Administration?