सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार!

गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) : सांगे मतदारसंघात गेल्या २६ वर्षांपासून असलेला काँग्रेसचा राजकीय दुष्काळ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. ‘गोंय राखण यात्रे’च्या २२व्या दिवशी सांगेत झालेल्या सभेत खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधीचा कथित गैरवापर, बेरोजगारी आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यांवरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

गोव्याला पाणी आणि खनिज संपत्ती पुरविणारा सांगे मतदारसंघ विकास आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. स्थानिक आमदार सुभाष फळदेसाई यांच्यावर टीका करताना, इतर भागांना पाणी पुरविणाऱ्या सांगेतील जनतेला पाणीटंचाई का सहन करावी लागते, असा सवाल त्यांनी केला. खाणबंदीमुळे हजारो कुटुंबांची उपजीविका उद्ध्वस्त झाली, तर संजीवनी साखर कारखाना बंद पडल्याने शेतकरी आणि कामगार संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी कल्याणासाठी राखीव असलेल्या सुमारे ३,२०० कोटी रुपयांच्या निधीचा हिशेब सरकारने द्यावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली. प्रेरणा दिन सोहळ्यातील कथित आर्थिक गैरव्यवहारावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. मंत्री दिगंबर कामत यांच्यावरील पूर्वीच्या कथित खाण घोटाळ्याच्या आरोपांबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आदिवासींना जमिनीचे मालकी हक्क देण्यात आणि गोव्याची जमीन व पर्यावरणाचे संरक्षण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. २०२७ मध्ये जनता भाजपच्या कारभाराला नाकारेल आणि सांगेत काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्या वडिलांच्या पालकमंत्रिपदाच्या कार्यकाळातील विकासकामांची आठवण करून दिली. सांगेतील जमिनींची विक्री, बेरोजगारी आणि आदिवासींच्या प्रश्नांबाबत चिंता व्यक्त करत काँग्रेस सक्षम उमेदवार देईल आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अनुसूचित जमातीचे नेते सत्यवान गावकर आणि सत्यवान तळवाडकर यांनी आदिवासींचे हक्क, खाणबंदी आणि संजीवनी कारखान्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर भाष्य केले. चंदा वेळीप यांनी महागाई आणि आदिवासी बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित केला. जितेंद्र नाईक यांनी पाणीटंचाईकडे, तर डॉ. शंकर नाडकर्णी यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणाकडे लक्ष वेधले.

या यात्रेत काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गिरीश चोडणकर, युरी आलेमाव, सुनील कवठणकर, एम. के. शेख यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सांगेतील २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपवून २०२७ मध्ये काँग्रेसचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करत गोव्याची जमीन, जंगले, जलस्रोत आणि आदिवासींच्या हक्कांच्या संरक्षणाची ग्वाही काँग्रेस नेत्यांनी दिली.

  • Related Posts

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार! ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल

    सांगे मतदारसंघात गेल्या २६ वर्षांपासून असलेला काँग्रेसचा राजकीय दुष्काळ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. ‘गोंय राखण यात्रे’च्या २२व्या दिवशी सांगेत झालेल्या सभेत खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधीचा कथित गैरवापर, बेरोजगारी आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यांवरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    गोव्यात प्रथमच शारदीय नवरात्रानिमित्त शिरोडा येथील हिमालयन समर्पण ध्यानस्थळी ११ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष आध्यात्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश सामूहिक ध्यान, आध्यात्मिक साधना, अंतःशांती आणि आत्मसाक्षात्कार आहे.

    You Missed

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार!

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार!

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार! ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार! ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल

    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    15/10/2026 e-paper

    15/10/2026 e-paper

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार