सत्ताधारी नेतेच उतरले आंदोलनात

मिराबागेत तेंडुलकर, पावसकर तर कोळशाविरोधात आमोणकर मैदानात

गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी)

सावर्डे मतदारसंघातील मिराबाग येथील वादग्रस्त बंधाऱ्याविरोधी आंदोलकांना माजी मंत्री, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तथा माजी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पावसकर यांनी भेट दिली. मुरगांवातील कोळसा विरोधी आंदोलनाला आमदार संकल्प आमोणकर यांनी जाहीर पाठींबा देऊन, तीन दिवसांत कोळसा हाताळणी बंद केली नाही तर मुरगांव बंदर क्षेत्रात घुसून काम बंद पाडणार, असा इशारा दिला. विधानसभा निवडणुकीला एक वर्षाचा कार्यकाळ बाकी असताना आता विविध आंदोलनांची झळ सत्ताधारी नेत्यांनाही बसू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
चिंबल येथील तळ्याचे रक्षण करण्यासाठी उभारलेले आंदोलन ४४ दिवसांनंतर यशस्वी ठरले. सरकारला त्यांची मागणी पूर्णतः मान्य करावी लागली. चिंबलच्या आंदोलनातून स्फूर्ती घेऊन आता ठिकठिकाणी लोक विविध विषयांवरून रस्त्यावर उतरू लागल्याने सत्ताधारी नेत्यांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिराबाग येथील कथित बंधाऱ्याचे काम लोकांना अजिबात विश्वासात न घेता हाती घेण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे सुमारे आठ गावांना धोका निर्माण होईल, अशी चिंता येथील लोकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या लोकांच्या मनातील शंका शास्त्रोक्त पद्धतीने दूर करण्यात सरकारी यंत्रणांना अद्याप यश मिळाले नसल्याने लोकांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे जाणकारांचे मत आहे.
तेंडुलकर, पावसकरांचा पाठींबा
मिराबाग येथे “आमका बंधारा नका” आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री विनय तेंडुलकर, माजीमंत्री दीपक पावसकर, जिल्हा पंचायत सदस्य मोहन गांवकर, सरपंच व पंच सदस्यांनी उपस्थित राहून लोकांना पाठिंबा दर्शविला. यावेळी पत्रकारांनी थेट सरपंचांना या प्रकल्पाविषयी विचारले असता त्यांनी, “आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही”, असे स्पष्टीकरण दिले. लोकांनी जोरदार विरोध केल्यानंतर पंचायतने मान्यता मागे घेतली. “प्रकल्पाचा अभ्यास न करता मान्यता देणे ही आमची चूक होती”, असेही सरपंचांनी प्रांजळपणे मान्य केले.
संकल्प आमोणकर उतरले मैदानात
मुरगावांत मंगळवारी कोळसा विरोधी आंदोलन झाल्यानंतर आमदार संकल्प आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली आज वेगळे आंदोलन छेडण्यात आले. “तीन दिवसांच्या आत कोळशाची दुर्गंधी आणि प्रदूषण रोखले नाही तर आत घुसून काम बंद करू”, असा इशारा आमदार संकल्प आमोणकर यांनी दिला. काल मुरगांवच्या जनतेने केलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आज संकल्प आमोणकर यांनी आपल्या समर्थकांसह आंदोलन करून शक्तीप्रदर्शन केले. कोळसा प्रदूषणाचा विषय हा मुरगावांत महत्वाचा ठरणार असल्याने या विषयापासून अलिप्त राहणे परवडणारे नसल्याने आता संकल्प आमोणकर यांनाही आंदोलनात उतरणे भाग पडले आहे.

  • Related Posts

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Indian squash player Yash Fadte reached the quarterfinals of the PSA Aramis Club Open in Belgium, demonstrating resilience in a grueling five-game battle against Scottish No. 1 John Meehan, following a remarkable comeback victory in the pre-quarterfinals.

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    मडगावातील प्रस्तावित बहुमजली पार्किंग प्रकल्पाच्या पायाभरणीला ११ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत ‘मडगांवचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. कोसळलेल्या शिलान्यास फलकाला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या प्रकल्पाला ‘अपयशाचे स्मारक’ असे संबोधले.

    You Missed

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    1526–2026: 500 Years of the Foral

    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM